स्मशानभूमीचे काम सत्ताधाऱ्यांनी रखडवले : प्रशांत शितोळे

रमेश मोरे 
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी (पुणे) : ‘सांगवीतील स्मशानभूमीचे काम गेली एक ते दीड वर्षापासून संथ गतीने चालू आहे. नव्या सत्ताधाऱ्यांना स्मशानभूमीच्या जुन्या कामातून काही मिळत नाही, म्हणून त्यांच्याकडून काम करु दिले जात नाही. मात्र काम आमच्यामुळे रखडल्याची उलटी बोंब मारत आहेत. असा आरोप राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

गेली दिड वर्षापासुन स्मशानभुमीचे काम संथगतीने सुरू आहे. सांगवी स्मशानभूमीची जागा मूळ जागा मालकांनी अडवणूक न करता रितसर मोबदला देण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे केली. मात्र या गोष्टीचे राजकारण करण्यात आले.

स्मशानभूमीचे नियोजन व प्रत्यक्ष काम 2016 मध्येच चालू झाले. त्यावेळी जागा मालकांना विश्वास दिला होता. परंतु, 2017 मध्ये सत्तांतरानंतर आलेल्या प्रतिनिधींना विकास  करणे दूरच पण चालू असणारे कामही व्यवस्थित करता येत नाही. सत्ताधाऱ्यांचे मोठे पदाधिकारी या परिसरात असूनही त्यांचा या कामावर अंकुश नाही. आयुक्तही या कामाच्या दिरंगाईस जबाबदार आहेत. त्यासाठी महासभेत हा विषय संपादित करण्याची मान्यता व्हावी आणि तातडीने स्मशानभूमीचे काम चालू करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे प्रशांत शितोळे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

Web Title: work is on hold because of government said prashant shitole