सांगवीतील जॉगींग ट्रॅकचे काम प्रगतीपथावर

रमेश मोरे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

जुनी सांगवी - जुनी सांगवी, नवी सांगवी येथील मध्यावर असलेल्या साई चौक ते माहेश्वरी (ईंद्रप्रस्थ) चौक या दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेकडुन येथील नाल्यावर उभारण्यात  आलेल्या जॉगींग ट्रॅकचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. पी.डब्ल्यु.डी. मैदानाच्या शेजारी होत असलेल्या या जॉगींग ट्रॅकमुळे परिसरातील सकाळी व संध्याकाळी व्यायाम व फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणा-या नागरीकांसाठी उपयोगी ठरणार आहे. 

यातच येथील परिसराचा ओसाडपणा जावुन या पदपथामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. जॉगींग ट्रॅक खाली साई चौक ते माहेश्वरी चौकातुन पवनानदीपात्रात हा नाला वाहतो. महापालिकेकडुन येथे भुमिगत पाईप टाकुन नाल्यावर जॉगींग ट्रॅकची उभारणी केली आहे. पदपथाच्या भोवती सिमाभिंती उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक भिंतीला ईंद्रधनुष सप्तरंग देण्यात आला आहे. याचबरोबर भिंतीवर वेली टाकण्यात येणार आहेत. सुमारे ७०० मीटर लांब व ३ मीटर रूंदीच्या या जॉगींग ट्रॅकला अंदाजित खर्च ६० लाख रूपये ईतका येणार आहे. यात रंगीत पेव्हींग ब्लॉक, नागरीकांना बसण्यासाठी बांधकामकरून बैठक कट्टे बनविण्यात आले आहेत. पथदिव्यांसोबत परिसरात हायमास्ट दिव्यांनी हा परिसर उजळणार आहे. पुर्वी ओसाड दुर्लक्षित राहिलेल्या या परिसराला या जॉगींग ट्रॅकमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

प्रभागातील सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नातुन हा जॉगींग ट्रँक साकारत आहे. नागरीकांना याचा आनंद घेता येईल
-संतोष कांबळे-नगरसेवक प्रभाग क्रं-३२

येथील सिमाभिंती बांधुन झाल्या आहेत.रंगरंगोटीचे काम सुरू आहे. पेव्हींग ब्लॉक,बैठक कट्टे,व ईतर कामे सुरू आहेत. शिरिष पोरेड्डी 
- अभियंता "ह" प्रभाग महापालिका 

Web Title: The work of jogging track in Sangvi is in progress