#SaveRiver : मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे रखडलेले काम पुन्हा वेगाने सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

ते मी बोललोच नाही...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अतिरेकी आहेत आणि त्याचे पुरावे आहेत, असे मी बोललोच नसल्याचे जावडेकर यांनी या वेळी स्पष्ट केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवाला ‘गोली मारो’ आणि भारत पाक ही विधाने भोवली हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निरीक्षण बरोबर आहे; पण यासोबतच पराभवाला आणखीही कारणे आहेत.

पुणे - मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे रखडलेले काम पुन्हा वेगाने सुरू करणार आहे. यासाठी राज्य सरकारबरोबर तसेच केंद्रामध्ये स्वतंत्र बैठक घेतली जाणार असल्याचे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिशा समितीच्या बैठकीसाठी जावडेकर पुण्यात आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्याच्या  ग्रामीण भागातील तीन हजार लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायत क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र सरकार स्वतंत्र अध्यादेश काढणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

पुणे : भाजप हा शिकणारा पक्ष : प्रकाश जावडेकर

ते म्हणाले, ‘‘शहरातील मेट्रोच्या वनाज ते कर्वे रस्ता आणि संत तुकारामनगर ते बोपोडी या दोन्ही मार्गांचे १२ किलोमीटर अंतराचे काम येत्या मार्चअखेर पूर्ण केले जाणार आहे. ही मेट्रो चाकणपर्यंत आणि दुसऱ्या मार्गावर वाघोलीपर्यंत वाढविण्याची मागणी होत आहे. त्यासाठी विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गासाठी आवश्‍यक जमीन हस्तांतरणाची कार्यवाहीसुद्धा येत्या मार्चअखेर पूर्ण केली जाणार आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The work on the Mula Mutha River Improvement Project is resumed