नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नगरपालिकेचे कामकाज ठप्प

मिलिंद संगई, बारामती
मंगळवार, 1 जानेवारी 2019

पुणे : राज्यातील नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ बारामती नगरपालिकेतील सर्व कर्मचारीही आजपासून बेमुदत बंदमध्ये सहभागी झाले आहेत. या बंदमुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नगरपालिकेचे कामकाज विस्कळीत झाले आहे. 

राज्यातील सर्व नगरपरिषद कर्मचाऱयांचे विविध मागण्यांबाबत कामगार संघटनांच्या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार राज्य शासनाने अद्याप एकही आदेश काढलेला नाही. तसेच या बैठकीतील मुद्यांवर काहीही कार्यवाही झालेली नाही. या शासनाच्या कृतीमुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना आहे.

शासनाकडून नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत जी चालढकल केली जात आहे, त्याच्या निषेधार्थ आजपासून बेमुदत काम बंद आंदोलनास कर्मचाऱ्यांनी प्रारंभ केला असल्याचे या बाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राज्य स्तरावर कर्मचारी संघटनेकडून जो पर्यंत काहीही आदेश येत नाही. तो पर्यत बेमुदत काम आंदोलन सुरुच राहणार असल्याचे कर्मचारी संघटनेने स्पष्ट केले आहे. आज नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी या बेमुदत काम बंद आंदोलनामुळे नगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. 

Web Title: The work of the municipality disturbed on the first day of New Year