चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटरचे कार्य कौतुकास्पद- अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती- येथील डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक यांच्या चैतन्य मातृत्व योजनेचे उदघाटन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार.

चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटरचे कार्य कौतुकास्पद; अजित पवार

बारामती : सामाजिक बांधिलकीचे भान राखून डॉ. आशिष व डॉ. प्रियांका जळक यांनी तब्बल 101 जोडप्यांना मोफत आयव्हीएफ तंत्राद्वारे अपत्यप्राप्तीचा केलेला संकल्प प्रशंसनीय आहे, असे गौरवोदगार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले. श्री चैतन्य टेस्ट ट्युब बेबी सेंटरने हाती घेतलेला उपक्रम अपत्यहिन जोडप्यांच्या जीवनात नवप्रकाश देणारा असल्याचे पवार म्हणाले.

या सेंटरच्या चैतन्य मातृत्व योजनेच्या उदघाटन प्रसंगी पवार बोलत होते. या कार्यक्रमात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माजी नगराध्यक्षा योगेश जगताप, राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा वनिता बनकर, करण खलाटे, डॉ. रमेश भोईटे, डॉ. संजय पुरंदरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: राज्यातील शाळांमध्ये ‘१०० दिवस वाचन अभियान’

अजित पवार यांनी यावेळी डॉ.आशिष जळक यांनी बारामतीत केलेल्या कामाची प्रशंसा केली. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता यापुढे सर्वांनीच अधिक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली. माणसारख्या दुष्काळी तालुक्यातील जळक परिवाराने वैद्यकिय क्षेत्रात घेतलेली भरारी त्या माध्यमातून जपलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

दत्तात्रय भरणे यांनी डॉ.शशांक, डॉ.आशिष, डॉ.प्रियंका व डॉ.कोयल या जळक परिवारातील डॉक्टरांचे कौतुक केले. जिरायती भागातील लोक कष्टाने यशाच्या शिखरावर पोहोचल्याचे भरणे म्हणाले. जळक परिवाराने आरोग्य क्षेत्रात रुग्णांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. गरीब रुग्णांवर उपचार करताना सामाजिक बांधिलकी ठेवावी असे आवाहन केले. आमदार गोरे यांनी, माझ्या मातीतल्या माणसांचा मला अभिमान असल्याचे सांगत जळक परिवाराने जपलेल्या सेवाभावाचे कौतुक केले.

हेही वाचा: बारामती : ...अन अजित पवार यांनी साधला समतोल

प्रास्ताविकात डॉ. आशिष जळक यांनी गेल्या तीन वर्षात योजनेअंतर्गत केलेल्या कामाचा आढावा घेतला. 22 जुलैपर्यंत या योजनेसाठी नोंदणी केली जाणार आहे. 101 जोडप्यांना मोफत उपचार तर त्यापुढील जोडप्यांना अवघ्या 80 हजार रुपयांत हे उपचार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपस्थितांचे स्वागत काशिनाथ जळक, डॉ. शशांक जळक, डॉ. प्रियंका व डॉ. कोयल जळक, डॉ. सुजित अडसूळ यांनी केले. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top