Pune News : मांजरी रेल्वे उड्डाणपूलाचे काम अंतिम टप्प्यात

दोन महिन्यात होणार वाहतूकीस खुला
work of manjari railway flyover final stage open for traffic in two months pune
work of manjari railway flyover final stage open for traffic in two months punesakal

मांजरी : गेली तीन वर्षांपासून भूसंपादनातील काही तांत्रिक अडचणीमुळे रखडलेल्या येथील रेल्वेवरील उड्डाणपुलाचे काम सध्या वेगात सुरू आहे. मांजरी गावाच्या बाजूने रखडलेले हे काम आठवड्यापूर्वी सुरू झाले असून येत्या दोन महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला होण्याचे संकेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले आहेत.

पाच वर्षापूर्वी कामाचे उद्घाटन झाल्यानंतर दोन्ही बाजूची अतिक्रमणे हटविण्यात गेलेला वेळ, नाशिक हायस्पीड रेल्वेला मिळालेल्या मंजूरीनंतर पुलाच्या पिलरचे बदललेले स्थान, दोन पदरी ऐवजी चार पदरीसाठी बदललेला आराखडा, दोन्हीही बाजूकडील पादचाऱ्यांसाठी केलेल्या भूयारी मार्गाचे दुचाकींसाठी बदललेले नियोजन,

थेट रेल्वेवरील ओव्हरहेडच्या कामासाठी रेल्वे वाहतूकीचा ब्लॉक घेण्यासाठी लागलेला वेळ आणि त्यानंतर शेवटी मांजरी गावच्या बाजूने एका शेतकऱ्याने हरकत घेऊन थांबविलेले काम, यामुळे या उड्डाणपूलाचे काम सलगपणे होऊ शकले नाही. कामातील हे अडथळे दूर करताना वारंवार पुलाच्या कामाची मुदत वाढवून घ्यावी लागली. त्यामुळे या पुलाचे काम रखडत रखडत सुरू होते.

पुलाच्या कामात शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्याने घेतलेल्या हरकतीमुळे मांजरी गावाच्या बाजूने बांधकाम विभागाकडून काम थांबविण्यात आले होते. दरम्यान, पुलास होणाऱ्या विलंबामुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागय होता.

या त्रासामुळे नागरिकांचा रोष वाढत चालला होता. अशातच सर्वपक्षीय नागरिकांनी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी चक्री उपोषण आंदोलन सुरू केले होते. त्याची दखल घेऊन आमदार चेतन तुपे पाटील यांनी आंदोलनात सहभागी होऊन सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून काम सुरू करण्याची मागणी केली.

कार्यकारी अभियंता अजय भोसले यांनी आंदोलकांना दोन महिन्यात काम पूर्ण करण्याची लेखी हमी दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांचे सहकार्य घेऊन गावाच्या बाजूकडून रखडलेले काम सुरू केले आहे. याठिकाणच्या कामात अडथळा ठरणाऱ्या एका इमारतीचा काही भाग पाडण्यात आलेला आहे. शेतकऱ्याच्या बाजूने रखडलेल्या पुलाच्या धारक भिंतीचे काम सध्या सुरु करण्यात आले आहे.

"काही महिन्यांपासून पुलाचे रखडलेले काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाची हलचाल मंदावली होती. प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता आमही सर्वपक्षीय नागरिकांनी चक्री उपोषण आंदोलन सुरू केले होते. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लेखी अश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन थांबविले आहे.'

- अजित घुले, ग्रामस्थ, मांजरी बुद्रुक

"येथील शेतकऱ्याने घेतलेल्या हरकतीमुळे काम थांबवावे लागले होते. पोलिसांची मदत घेऊन काम वेगात सुरू आहे. येत्या दीड-दोन महिन्यात पुलाचे संपूर्ण काम पूर्ण होऊन त्यावरून वाहतुकही सुरू होईल.'

- नकुल रणसिंग, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com