Katraj News : कात्रज बाह्यवळण मार्गावरील नव्या भुयारीमार्गाचे काम प्रगतीपथावर

कात्रज ते नवलेपूल या बाह्यवळण महामार्गाचे काम सुरू असून बेलदरे पंपासमोरील नव्या भुयारी मार्गाचे एका बाजूचे काम अंतिम टप्प्यात आहे.
Katraj WRoad Work
Katraj WRoad Worksakal

कात्रज - कात्रज ते नवलेपूल या बाह्यवळण महामार्गाचे काम सुरू असून बेलदरे पंपासमोरील नव्या भुयारी मार्गाचे एका बाजूचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित काम फेब्रुवारीअखेर पूर्ण होणार आहे. तसेच, दत्तनगर येथील राजमाता भुयारी मार्गाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता अतुल सुर्वे यांनी दिली.

बाह्यवळण महामार्गावरील सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम व वाहतूक नियोजन याबाबत माजी नगरसेवक युवराज बेलदरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण शाखा अभियंता अतुल सुर्वे, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत कणसे यांनी पाहणी केली.

कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावरील कात्रज ते नवलेपूल या साडेतीन किलोमीटर अंतराचे सहा पदरी रुंदीकरण काम राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. दत्तनगर येथील राजमाता भुयारी मार्गावर येणारा वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बेलदरे पंप येथे अतिरिक्त भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे.

तसेच, अरुंद व कमी उंचीच्या दत्तनगर राजमाता भुयारी मार्गात नित्याची होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नव्याने १८ मीटर रुंद व ५ मीटर उंच भुयारी मार्ग बांधण्यात येणार असून हे काम पंधरा दिवसात सुरू होणार आहे असे बेलदरे यांनी सांगितले.

दत्तनगर-जांभूळवाडी रस्त्यावर वाहतूक अधिक असल्याने राजमाता भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी वाहतुकीत बदल करावा लागेल. त्या दृष्टीने नियोजनासाठी संबधित अधिकारी बैठक घेऊन अंतिम नियोजन केले जाईल, असे कणसे यांनी सांगितले.

Katraj WRoad Work
Pune Katraj Dairy : 'दूध उत्पादकांना थेट ५ रुपये अनुदान देण्याची मागणी'

प्रतिक्रिया

महामार्गावरील पावसाळी व ड्रेनेज लाईनला क्रश बॅरिगेट कव्हर करण्यासाठी साडे अकरा कोटी निधीच्या मागणीचा प्रस्ताव दिला आहे. तसेच, अभिनव कॉलेज ते चिंतामणी शाळा ओव्हरहेड पादचारी मार्गाची मागणी केली आहे. सदर कामे गतीने व गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

- युवराज बेलदरे, माजी नगरसेवक.

मे महिनाअखेर संपूर्ण रुंदीकरणाचे काम पूर्ण व्हावे. या दृष्टीने गती देण्यात येत आहे. लवकरात लवकर कामे पूर्ण क्तून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- अतुल सुर्वे, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, प्राधिकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com