Pune : लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

lohgaon airport

Pune : लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू

पुणे : पुणे विमानतळ आजपासून पुढील चौदा दिवस बंद राहणार असून पहिल्याच दिवशी विमानतळाच्या धावपट्टीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शनिवारी हवाईदलाच्या वतीने आयोजित ‘एअर शो’साठी पर्यायी ‘पॅरेलल टॅक्सी ट्रॅक’चा वापर करण्यात आला. तर धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण होईल अशी माहिती विमानतळ प्रशासन व हवाईदलाने दिली आहे.

हेही वाचा: "...किती हा भाबडेपणा?"; फडणवीसांची शरद पवारांवर खोचक टीका

या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम अनेक वर्षांपासून बाकी होते. विमानतळ प्रशासनाकडून देखील याचे नियोजन करण्यात आले होते. या आधी २६ एप्रिल ते ९ मे असे १४ दिवसांसाठी पुणे विमानतळ बंद ठेवण्यासाठी नियोजन केले होते. परंतु वेळेत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा व इतर आवश्‍यक साहित्यांचा पुरवठा करण्यासाठी विमानतळ प्रशासनाने धावपट्टीच्या दुरुस्तीच्या कामाला काही काळासाठी पुढे ठकलले होते. तसेच रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत विमानसेवा बंद करत दुरुस्तीच्या कामाचे नियोजन देखील करण्यात आले होते. मात्र, ते शक्य न झाल्यामुळे आता भारतीय हवाईदल आणि विमानतळ प्रशासनाच्या वतीने शनिवारपासून ते येत्या २९ ऑक्टोबरपर्यंत विमानतळ बंद करण्यात आले आहे. तर सध्याचे नियोजन पाहता ३० ऑक्टोबरपासून विमान सेवा पुन्हा सुरू होतील, असे हवाईदलाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: 'पितृपक्ष' ही भोंदूगिरी; उद्धव ठाकरेंनी दिला प्रबोधनकारांचा दाखला

सध्या विमानतळ बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांची गैर सोय होत आहे. या १४ दिवसांमध्ये तिकिटं बुक केलेल्या प्रवाशांना आपले बुकिंग रद्द करण्यापासून ते पर्यायी वाहतूक सेवेची व्यवस्था करावी लागत आहे. तसेच अनेकांनी पर्यटनासाठीचे नियोजनात ही बदल केले आहे. दरम्यान हवाईदलाने जाहीर केलेल्या अधिकृत निवेदनानुसार पुण्यातून कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसून त्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Work On Lohgaon Airport Runway Started After 14 Day

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :pune airport
go to top