जलसंधारणाच्या श्रमदानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होणे गरजेचे : सुनंदा पवार

संतोष आटोळे
बुधवार, 18 एप्रिल 2018

पुणे : जलसंधारणासारख्या विधायक उपक्रमात सर्वांनी स्वतःची जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे. यामध्ये कोणताही मी पणा न ठेवता श्रमदानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होणे गरजेचे आहे तरच परिवर्तन दिसेल असे प्रतिपादन अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदाताई पवार यांनी केले.

गाडीखेल ( ता. बारामती) सकाळ रिलीफ फंड, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती व बारामती अॅग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणाऱ्या ओढा व तलाव खोलीकरण कामाच्या शुभारंभाप्रसंगी सुनंदा पवार  बोलत होत्या.

यावेळी सरपंच बाळासाहेब आटोळे, उपसरपंच नानासाहेब जगताप, पाणी फाउंडेशन तालुक समन्वयक पृथ्वीराज लाड, ग्रामपंचायत सदस्य शरद शेंडे, शकुंतला चव्हाण, लताबाई दळवी, संगीता धायतोंडे, माजी सरपंच तानाजी आटोळे, अनिल आटोळे, दिलीप आटोळे, रायचंद आवदे, भाऊसो दळवी, दादा आटोळे, सुभाष शेंडे, ग्रामसेवक अरुण जाधव, गावकामगार तलाठी विनोद धापटे, कृषी सहायक कुंभार, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाल्या, ''राज्यात पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत अनेक गावात चुल बंद करुन ग्रामस्त श्रमदान करत आहेत. ज्यांनी दुष्काळाच्या झळा सोसल्या त्यांना दुष्काळ माहित आहे.आपल्याला अनेक वेळा लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून जीवनावश्यक सुविधा मिळतात म्हणून त्रास होत  नाही.परंतु पाण्यासाठी इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वावलंबी असणे गरजेचे आहे.यासाठी जलसंधारणाची कामे गरजेची आहेत.

सकाळ रिलीफ फंडाचे जलसंधारणात महत्वाचे योगदान
आगामी काळामध्ये येणारे दुष्काळाचे संकट टाळण्यासाठी जलसंधारण कामांची नितांत गरज आहे. हे ओळखत सकाळ सारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या वृत्तपत्र समूहाचे महत्वाचे योगदान आहे. तसेच अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती ,बारामती अॅग्रो यांनी ओढ़ा खोलिकरण कामासाठी मशिन दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो.

Web Title: Work from Sakal Relief fund begins at Baramati