पुणे-सोलापूर महामार्ग - हस्तांतरणापूर्वीच्या कामाला सुरवात

road
road

उरुळी कांचन (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील कवडीपाट (कदमवाकवस्ती ता. हवेली) ते कासुर्डी (ता. दौंड) या दरम्यानच्या कवडीपाट व कासुर्डी या दोन्ही टोलनाक्याची (टोलवसुलीची) मुदत पुढील वर्षी 31 मार्चला संपणार आहे. कवडीपाट ते कासुर्डी हा पंचविस किलोमिटर लांबीचा रस्ता मागील सोळा वर्षापासुन आयडीयल रोड बिल्डर्स (आयआरबी) यांच्या ताब्यात असुन, 31 मार्च 2019 रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे या रस्त्यांचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व आयडीयल रोड बिल्डर्स (आयआरबी) यांच्यात झालेल्या करारानुसार रस्ता हस्तांतरण करण्यापुर्वी मुख्य रस्ता व त्या लगतच्या सेवा रस्तांचे पुर्णतः डांबरीकरण करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. 

कवडीपाट ते कासुर्डी या पंचविस किमी लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम बांधा, वापरा व हस्तांतरीत (बिओटी) करा या तत्वानुसार सोळा वर्षापुर्वी करण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व आयडीयल रोड बिल्डर्स (आय आर बी) यांच्यात झालेल्या करारानुसार सोळा वर्षे या रस्तावर कवडीपाट व कासुर्डी या दोन ठिकाणी टोल वसुली करण्यास आयआरबीला परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार वरील दोन्ही टोल नाक्यावरील टोल वसुलीची मुदत 31 मार्चला संपणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व आयडीयल रोड बिल्डर्स (आय आर बी) यांच्यात झालेल्या करारानुसार सोळा वर्षे या रस्तावर टोल वसुली करतानाच, या रस्तांची दुरुस्ती करण्याचे बंधन आयआरबी वर घालण्यात आले होते. तसेच रस्ता हस्तांतरण करतांना, पंचविस किलोमि्टर रस्तांचे पुर्णतः डांबरीकरण करण्याचे बंधनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आयआरबीवर घातले होते. त्यानुसार आयआरबी कंपनीने रस्तांच्या डांबरीकरणांचे काम मागिल महिनाभऱापासुन सुरु केले आहे. 

टोल वसुली सुरु असतांना, रस्त्याच्या संपूर्ण देखभालीची जबाबदारी सबंधित कंपनीवर बंधनकारक असली तरी, आयआरबी कंपनीने मागील सोळा वर्षाच्या कालावधीत रस्तांच्या सुरक्षिततेकडे मोठ्या प्रमानात दुर्लक्ष केल्याचे दिसुन आले आहे. कवडीपाट ते कासुर्डी या दरम्यान अऩेक ठिकाणी रस्त्याच्या पृष्ठभागाचा असमतोल, कमी उंचीचे रस्ता दुभाजक, पुसलेले झेब्रा क्रॉसिंग, खचलेल्या साईड पट्ट्या, मुख्य रस्ता व सेवा रस्त्यादरम्यान तुटलेल्या जाळ्या, धोक्याच्या व अपघाताच्या ठिकाणी सूचना फलकांचा आभाव, सेवा रस्त्यांवर सरर्रास झालेले अतिक्रमण, हायमास्ट व ब्लिंकर, रिफ्लेक्टरचा आभाव अशा विविध समस्या आढळत आहेत. तर कदमवाकवस्ती व उरुळी कांचन गावातील सेवा रस्ते, महामार्गालगच्या दुकानदारांनी गिळले आहेत. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत वारंवार अपघात होत असतानाही, रस्तावरील अतिक्रमने काढण्याकडे आयआरबी कंपनीने दुर्लक्ष केल्याचे दिसुन आले आहे. सध्या कासुर्डीबाजुने मुख्य रस्याच्या डांबरीकरणाचे काम चालु आहे. मात्र या कामाचा दर्जा फारसा चांगला नसल्याची नागरीकांची तक्रार आहे 

याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहाय्यक बांधकाम अभियंता राहुल कुलकर्णी म्हणाले,"कवडीपाट ते कासुर्डी या पंचविस किलोमिटर लांबीच्या स्त्याच्या संपूर्ण दुरुस्तीचे काम तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. यामध्ये सुरुवातील संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण, दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण सेवा रस्ते व साईड पट्ट्यांची दुरुस्ती व तिसऱ्या टप्प्यामध्ये रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग, रिफ्लेक्टर, ब्लिंकर, दिशादर्शक फलक, गावे व अंतर दर्शवणारे फलक उभारण्यात येणार आहेत. टोलवसुली सुरु असेपर्यंत संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. सेवा रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे हटविण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत व अतिक्रमण धारकांना नोटिशी बजावण्यात येणार आहेत. तसेच महार्मागावर सुरु असलेल्या अवैधरित्या उभ्या राहणाऱ्या वाहनांविरोधात पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रार देणार आहे."

ठळक मुद्दे...
कदमवाकवस्ती- 
रस्तालगतच्या दुकानदारांनी सेवा रसत्यावर अतिक्रमण केल्याने वाकवस्ती व लोणी स्टेशन परीसरात सेवा रस्ता गायब. 
दुकानात येजा करण्यासाठी ठिकठिकाणी मुख्य रस्त्यावरुन सेवा रस्ताला बेकायदा रस्ता जोड.
लोणी स्टेशन परीसरात रस्तावरच ठिकठिकाणी खाद्याच्या गाड्या.
बेकायदा वाहतुकीची वाहने ठिकठिकाणी उभी.
मुख्य रस्त्यापेक्षा सेवा रस्तांची उंची कमी असल्याने दुचाकी घसरुन वारंवार अपघात.

उरुळी कांचन
एलाईट चौक ते कस्तुरी मंगल कार्यालयापर्यंत दोन्ही बाजुंच्या दुकानदारांनी सेवा रसत्यावर अतिक्रमण केल्याने पायी चालणे अवघड. 
बेकायदा प्रवाशी वहातुक करणारी वाहने रस्तावर थांबत असल्याने, रोजचीच वाहतुक कोंडी.
मुख्य रस्त्यापेक्षा सेवा रस्तांची उंची कमी असल्याने दुचाकी घसरुन वारंवार अपघात
रस्तावरच ठिकठिकाणी खाद्याच्या गाड्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com