हडपसरमधील 'या' भुयारी मार्गाचे काम होणार तरी कधी?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

ससाणेनगर येथील रेल्वे गेटवर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूला भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

हडपसर (पुणे) : ससाणेनगर येथील रेल्वे गेटवर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूला भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. एक भुयारी मार्ग वाहतुकीसाठी सुरू झाला असून, दुसऱ्या भुयारी मार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे सय्यदनगर- ससाणेनगर रेल्वे फाटकावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व प्रदूषण होत आहे. त्यामुळे तातडीने हे काम पूर्ण करावे, अशी नागरिकांची मागणी आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

नागरिक संजय सातव म्हणाले, की रेल्वे गेट क्र. ७ व ८ दरम्यानचा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्याने रेल्वे फाटक क्र. ७ वरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र, रेल्वे गेट क्र ७ आणी ६ या दरम्यानच्या भुयारी मार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे रेल्वे फाटक लागल्यानंतर ससाणेनगर-सय्यदनगर आणि हांडेवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. महापालिका व लोकप्रतिनिधींनी गेट क्र. ६ व ७ मधील रखडलेले भुयारी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या बाबत नगरसेविका वैशाली बनकर, योगेश ससाणे आणी मारुती आबा तुपे, उज्वला जंगले म्हणाले, की गेट क्र. ७ व ६ दरम्यान भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, या मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम रखडले आहे. या मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यासाठीची खासगी मालकाची जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. त्यामुळे हे काम रखडले आहे. मात्र, लवकरच ही जागा महापालिकेच्या ताब्यात मिळेल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. चालू आर्थीक वर्षात आवश्यक तो निधी या कामासाठी उपलब्ध आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: work on subway at railway gate at sasanenagar stalled