
खळद : सासवड- जेजुरी पालखी महामार्गावर खळद (ता. पुरंदर) येथे गोटेमाळ वस्तीलगत असणाऱ्या अनधिकृत होर्डिंगवर फ्लेक्स बसविताना विजेचा झटका बसून भवरसिंग कर्णी दानजी लखावत (वय ४८, रा. कोंढवा, ता. हवेली, मूळ रा. रेंदही, ता. सोजत, जि. पाली, राजस्थान) यांचा मृत्यू झाला.