रोजंदारीअभावी मजुरांचे हाल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पिंपरी - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्याने सर्वत्र सुटे पैसे मिळणे कठीण झाले. अनेक ठिकाणी व्यवहार ठप्प झाले आहेत. ठेकेदारांकडे पैसे नाहीत. परिणामी, मजुरांना रोजंदारी मिळत नाही. त्यांचे हाल सुरू झाले आहेत. पगाराअभावी घरात चूल पेटविणे मुश्‍किल झाले आहे. बॅंकाही ठराविक रक्कमच देत असल्याने अनेकांनी बांधकामे बंद ठेवल्याचे ठेकेदार बाबू मिरजे यांनी सांगितले. रहाटणी फाटा, भोसरी, डांगे चौक, चिखली, बालेवाडी फाटा आदी ठिकाणच्या मजूर ही परिस्थिती आढळली. 

पोटाला चिमटा घेऊन काही बचत केलेल्या मजुरांना काटकसरीने पैसे वापरून दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ""गेल्या चार दिवसांपासून घरखर्च भागविणे कठीण झाले आहे. बॅंक ठराविक रक्कम देत असल्याने बांधकाम मालकाने ठेकेदाराला काम बंद ठेवण्यास सांगितले आहे. ठेकेदारानेदेखील पैशांअभावी नकार दिला. वडापाव आणि चहा पिऊन भूक मारत आहोत. काम कधी सुरू होईल याची वाट पाहत आहोत,'' असे डांगे चौकातील मजूर भीमाप्पा मुलीमणी आणि निगडीतील अंकुश चौकातील प्रषिक उशिरे यांनी सांगितले. 

Web Title: Workers do not receive wages

टॅग्स