बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सफाई कामगारांना कपडे वाटप

रमेश मोरे
शनिवार, 14 एप्रिल 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील आरोग्य विभागाच्या सफाई महिला कामगारांना साडी वाटप तर पुरूष कामगारांना ड्रेस कपडे वाटप करण्यात आले.

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त येथील आरोग्य विभागाच्या सफाई महिला कामगारांना साडी वाटप तर पुरूष कामगारांना ड्रेस कपडे वाटप करण्यात आले.

येथील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन व संतोष कांबळे मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक कृतज्ञता म्हणुन हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यात एकुण ७५ सफाई कामगारांना ड्रेस,व साडी वाटप करण्यात आले. फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनच्या मार्गदर्शिका श्रीमती सुशिला कांबळे यांच्या हस्ते सफाई कामगार महिलांना साडी वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक संतोष कांबळे म्हणाले, सफाई कामगार परिसर स्वच्छतेसाठी काम करतात, परिसर स्वच्छतेसाठी ते मोलाचे योगदान देतात. तुटपुंज्या पगारावर काम करत असताना जनमाणसात त्यांचा सन्मान व्हावा हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

कार्यक्रमास आरोग्य प्रभाग अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर,सांगवी आरोग्य निरिक्षक उद्धव डवरी, भाजप युवा मोर्चाचे जवाहर ढोरे नगरसेवक हर्षल ढोरे,सिनेट सदस्य संतोष ढोरे,नगरसेविका शारदा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सफाई कामगारांनी कमी पगार तो ही वेळेवर होत नसल्याने घर चालविण्यासाठी आर्थिक ओढाताण करावी लागते.ठेकेदार वेळेवर पगार करत नसल्याच्या व्यथा प्रभाग अधिका-यांसमोर मांडल्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्र संचलन तृप्ती कांबळे यांनी केले.तर आभार अविनाश कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी राहुल विधारे, रविंद्र यादव, प्रविण कांबळे, सुनिल कांबळे, निमिष कांबळे, अमित बाराथे, यश भालेराव आदींनी परिश्रम घेतले. 

Web Title: workers on the occasion of Babasaheb's birth anniversary