सुशिक्षित बेरोजगारांसाठी मार्गदर्शन शिबीर

पराग जगताप
गुरुवार, 12 जुलै 2018

ओतूर : ता.जुन्नर येथे जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले व पंचायत समिती सदस्य विशाल तांबे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा उदयोग केंद्र व महात्मा फुले स्वयंरोजगार संस्था पुणे यांच्या मार्फत सुशिक्षित बेरोजगासाठी एक दिवसीय स्वयंरोजगार व राष्ट्रीयकृत बँकेच्या सबशिडी व कर्जवितरण संदर्भात मार्गदर्शनपर चर्चासत्र शिबीर आयोजित केले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक मनोज शिंदे (आळेफाटा), तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा उदयोग केंद्र पुणे येथील जिल्हा उद्योग निरीक्षक जितेंद्र देशमुख होते. यावेळी जिल्ही परिषद सदस्य मोहित ढमाले, पंचायत समिती सदस्य विशाल तांबे, माजी प्राचार्य डी. बी. दाते, उद्योजक जालंदर पानसरे, प्रेमानंद अस्वार, गणेश तांबे, पिंटू नलावडे, राजू वाळुंज, ऋतुराज नलावडे, ग्रामपंचायत सदस्या स्मिता डुंबरे, सुनील शिरसाठ आदी उपस्थित होते.

यावेळी युवकांना स्वयंरोजगार व विविध व्यवसाय विषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यात व्यावसाय निवड, कोणत्या व्यवसायाला बँक किती टक्के सबसिडी कर्ज देते, कोणत्या व्यवसाय सध्या बाजारात यशस्वी होईल. या व इतर अनेक व्यवसाया संबंधिच्या विषयाची चर्चा व मार्गदर्शन जिल्हा उद्योग केंद्र, पुणेचे जिंतेद्र देशमुख यानी उपस्थित केले. या चर्चासत्रामध्ये शंभर पेक्षा जास्त युवक युवती सहभागी झाले होते. अडीचशे पेक्षा जास्त युवक युवतीनी स्वयंरोजगारासाठी व पुढील काळात त्यासाठी मार्गदर्शन मिळण्यासाठी नोंदणी केली आहे.

Web Title: workshop for educated unemployed