Pune News : हडपसर पोलीसांकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Workshop for school students Hadapsar Police safety training traffic rule

Pune News : हडपसर पोलीसांकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

हडपसर : येथील पोलीसठाण्याच्या वतीने गोंधळेनगर येथील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पोलीसठाण्यातील दामिनी पथक व गोपनीय विभाग यांच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. पहिली ते नवव्या इयत्तेतील विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांना "गुड टच - बॅड टच', बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण, महिला व बाल सुरक्षा, सोशल मीडियाचा वापर, त्यातून वाढणारी बाल गुन्हेगारी, वाहतुकीचे नियम याबाबत पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दीदी दामिनी पथकाच्या वैशाली उदमले, पोलीस काका गोपनीय विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे यांनी माहिती दिली.

त्यांनी यावेळी मुलांच्या अडचणी जाणून घेत मार्गदर्शन केले. समुपदेशक ग्रविटस फाउंडेशनच्या रेणुका नाईक, आशा खेडकर, अनघा डोरले, निशा कुलकर्णी, प्राजक्ता सहस्त्रबुद्धे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका उज्वला जगताप, सुशीला साळुंखे, विजय बारकुल यावेळी उपस्थित होते.