ऑनलाइन पद्धतीने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल

ऑनलाइन पद्धतीने पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा संपन्न

इंदापूर : विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाली. या कार्यशाळेत ८० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यालयाच्या प्राचार्या सौ. ज्योती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कलाशिक्षक बिरू नायकुडे व नवनाथ वावरे यांनी ही कार्यशाळा यशस्वी केली.

हेही वाचा: दौंड - भीमा पाटस प्रकरणी अण्णा हजारे यांना साकडे

यावेळी प्राचार्य सौ. जगताप म्हणाल्या, पर्यावरण पूरक गणपती बनवतानापर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल कसा राखावा याबाबतत्यांनीअनमोल मार्गदर्शन केले. यावेळी गणेशोत्सवाचे महत्व , त्यातून झालेली विधायक कामे याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा: पुणे : पाणी प्रश्‍नावरून मुख्यसभेत कावड आंदोलन

यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणपती कसे बनवायचे याचे ऑनलाइन प्रात्यक्षिक दाखवून श्री. नायकुडे व वावरे यांनीविद्यार्थ्यां कडून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवूनघेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी चिखलमाती पासून गणेश मूर्ती बनविण्याचा आनंद लुटला. त्यांच्यातील सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी कला शिक्षक बिरू नायकुडे व नवनाथ वावरे यांनी अतोनात परिश्रम घेतले.