आवाजाच्या दुनियेची कार्यशाळा

‘सकाळ’ आणि ‘ए. के. स्टुडिओ’तर्फे ऑनलाइन मार्गदर्शन
Vikram Gokhale
Vikram Gokhaleesakal

पुणे - ‘तुमचा आवाज किती चांगला आहे’, ‘तुम्ही कथा फारच सुंदर वाचता’, या आणि अशा अनेक प्रतिक्रिया तुम्हाला अनेकांकडून मिळत असतील. हाच तुमचा ‘आवाज’ तुमची ओळखही होऊ शकतो आणि तुमचं करिअरसुद्धा! आवाजाची ही कला फक्त आवडीपुरती मर्यादित न ठेवता, योग्य प्रशिक्षण घेऊन आवाजाच्या माध्यमातून अर्थार्जनाचा एक उत्तम पर्याय तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. मात्र त्यासाठी आवाजावर योग्य संस्कार करणे आणि शास्त्रशुद्ध ज्ञान घेणेही तितकंच महत्त्वाचे आहे.

यासाठीच ‘सकाळ’ आणि ‘ए. के. स्टुडिओ’ यांच्यातर्फे ‘व्हॉइस ओव्हर आणि कार्टून, फिल्म डबिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी’ या विषयावर मोफत ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. २९) सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत झूम ॲप्लिकेशनवर होणार आहे. या कार्यशाळेत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच, ‘ए. के. स्टुडिओ’चे संचालक आणि गेली सुमारे १५ वर्षे व्हॉईस ओव्हर इंडस्ट्रीमध्ये काम करणारे केदार आठवले हे व्हॉईस कल्चर, व्हॉईस मॉड्युलेशन, व्हॉईस ओव्हर टेक्निक्स आदींसाठी गरजेच्या असणाऱ्या तंत्रांची माहिती देण्यासह प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करणार आहेत. ही ऑनलाइन कार्यशाळा सर्वांसाठी मोफत आहे. मात्र त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

पूर्वनोंदणी साठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक

https://zoom.us/webinar/register/WN_WITUK8O5TXKanZZ0wEno1g

ऑडिओबुक्स, कार्टून फिल्म्स, विविध भाषांमधील डबिंग, रेडिओवरील जाहिराती, ई-लर्निंग, माहितीपट या सगळ्यांसाठी ज्यांना आवाज द्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही कार्यशाळा उत्तम पर्याय असेल, असा विश्वास केदार आठवले यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com