esakal | उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट
sakal

बोलून बातमी शोधा

अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बारामती : राज्यातील कोरोना रुग्णांसाठी केलेल्या कामांची दखल घेत लंडनस्थित वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स कड़ून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

हेही वाचा: माळेगावात दोन व्यापाऱ्यांची हाणामारी इतर विक्रत्यांना पडली महागात

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे (यूरोप) अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात 70 देशामध्ये कोरोनामुक्तीसाठी जनजागृती केली जात आहे. कोरोनामुक्तीसाठी कार्य करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या संस्थेच्या वतीने व्यक्ती व संस्थांना सन्मानित केले जाते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेले धडाडीचे व झटपट निर्णय , वैदयकीय सुविधा प्राप्त करून देण्यासाठी केलेले कार्य, कोरोनामुक्तीसह रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी त्यांनी केलेल्या कामांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला गेला.

हेही वाचा: Pune : राज्यात 'निपाह'चे सर्वेक्षण सुरू

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे राष्ट्रीय सचिव डॉ. दीपक हरके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालयात हा पुरस्कार प्रदान केला गेला.

loading image
go to top