पुस्तिकेतून वाहतूक जनजागृती

खंडुजीबाबा चौक - जागतिक चालक दिनानिमित्त सारथी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात सिग्नलवरील दुचाकीचालक महिलेला नियमांची पुस्तिका देताना किरण बालवडकर व सारथी प्रतिष्ठानचे पदाधिकारी.
खंडुजीबाबा चौक - जागतिक चालक दिनानिमित्त सारथी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात सिग्नलवरील दुचाकीचालक महिलेला नियमांची पुस्तिका देताना किरण बालवडकर व सारथी प्रतिष्ठानचे पदाधिकारी.

पुणे - जागतिक चालक दिनानिमित्त सारथी प्रतिष्ठानतर्फे रस्ता सुरक्षा जनजागृती करण्यात आली. डेक्कन येथील खंडोजीबाबा चौक येथे पोलिस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या हस्ते वाहतुकीचे नियम पाळण्याबाबतच्या पुस्तिकेचे वाटप करत वाहतूक नियमांची माहिती दिली.

केंद्र सरकारचा नवीन वाहतूक कायदा, वाढीव दंड शुल्क व त्याबाबतची राज्याची भूमिका, रस्ते अपघात आदी विषयांवर या वेळी बालवडकर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष मानमोडे, कार्याध्यक्ष अनिल जाधव, सचिव राजेंद्र वाघचौरे, अंकुश ओंबळे, संतोष जगताप, एकनाथ पासलकर आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. नवीन वाहन परवाना देताना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. त्यामुळे प्रत्येक वाहन परवानाधारकाने नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांबाबत वाहनचालकांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे बालवडकर यांनी सांगितले. तसेच, या कार्यक्रमात संजीवन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील थिगळे, शासकीय कर्मचारी संघटनेचे मारुती शिंदे, रोड सेफ्टी ट्रेनरचे बालाजी माने, डेक्कन जिमखाना लायन्स क्‍लबचे अध्यक्ष अभिजित मारणे यांनी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com