World Environment Day : शहर परिसरामध्ये वीस प्रजातींचे एकच झाड शिल्लक

वृक्षवल्ली आम्हा सोयरे फक्त म्हणण्यापुरते नसावे
हिंगणबेट
हिंगणबेटsakal

हिंगणबेट

शास्त्रीय नाव : बॅलॅनायटिस इजिप्शिया

ठिकाण : बोपदेव घाट रस्ता, जाल मेहता फाउंडेशन हॉस्टेल, कोंढवा

कोरड्या प्रदेशात आढळणारा, लहान वृक्ष. फांद्या जाड, उभ्या. काटेरी. पाने जोडीने, अरुंद, राठ. फुले १ सेंमी, सुगंधी, हिरवी. फळे ४-५ सेंमी, लांबट गोल, पिवळी, चिकट डिंक असणारी.

महत्त्व : फळांमध्ये औषधी गुणधर्म.

गोंदण

शास्त्रीय नाव : कॉर्डिया सायनेनसिस

ठिकाण- स्वारगेट बसडेपोच्या दारात, शंकरशेठ रस्ता

कोरड्या प्रदेशात आढळणारा मध्यम उंचीचा सदाहरित वृक्ष. फांद्या लोंबणाऱ्या. पाने ५-८ सेंमी, लांबट, फुले छोटी, पांढरी. फळे १ सेंमी, गोल, केशरी, चिकट (गोंदासारखी) गराची, म्हणून गोंदण

महत्त्व : याखेरीज वैशाली हॉटेल मागे एक वृक्ष आहे, पण इथला गोंदण एका पिंपळाच्या पोटातून दत्तक घेतल्यासारखा वाढला आहे.

रुद्राक्ष

शास्त्रीय नाव : इलिओकार्पस गॅनिट्रस

ठिकाण : वनदेवी मंदिरासमोरचा रस्ता, भुजबळ बागेच्या वळणावर, कर्वेनगर

हिमालयाच्या पायथ्याच्या जंगलात वाढणारा मध्यम उंचीचा सदाहरित वृक्ष. पाने १०-१५ सेंमी, लांबट. फुले छोटी, पांढरी, लांब माळेत. फळे ३ सेंमी, लांबट, निळसर काळी, गोड गराची.

महत्त्व : फळातल्या कडक बी ला धार्मिक महत्त्व.

दुरंगी बाभूळ

शास्त्रीय नाव : डायक्रोस्टॅचिस सिनेरिया

ठिकाण : मोदी गणपती मंदिराच्या मागे, नारायण पेठ

काटेरी खुरट्या जंगलात आढळणारा लहान वृक्ष. फांद्या पातळ, काटेरी. पाने संयुक्त, अगदी लहान आकाराची. फुले २-३ सेंमी, केसाळ, दुरंगी, आकर्षक. शेंगा ३-५ सेंमी, चपट्या

महत्त्व : फुले नसताना हा वृक्ष गणपतीला प्रिय असणाऱ्या शमीसारखा दिसतो.

टेटू

शास्त्रीय नाव : ओरोक्झायलम इंडिकम

ठिकाण-ताथवडे उद्यानासमोर, कर्वेनगर

दमट पानगळीच्या जंगलात आढळणारा मध्यम उंचीचा वृक्ष. पाने संयुक्त, खूप मोठी. फुले गुलाबी, मोठी, उग्र वासाची, फांदीच्या टोकाला मोठ्या गुच्छात रात्री उमलतात.

महत्त्व - शेंगा मोठ्या तलवारी सारख्या लटकतात, वाऱ्यात आपटून तडकतात आणि कागदी बिया सांडतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com