मंचरला पर्यावरण दिनानिमित्त वृक्षदिंडी व केशर आंबा लागवड

आम्हाला नको बांगला गाडी हवी हिरवी झाडी
world environment day
world environment daysakal

मंचर : येथील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालय व ज्ञानशक्ती विकास वहिनी संस्था यांच्या वतीने आयोजित केलेल्या वृक्ष दिंडीला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘आम्हाला नको बांगला गाडी हवी हिरवी झाडी’, ‘एक मूल एक झाड’, ‘झाडे लावा वसुंधरा नाटवा’ आशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

वृक्षदिंडीचा शुभारंभ भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,उद्योजक भरत भोर व रामा अँटो मोटर्सचे संचालक अरविंद वळसे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी प्राचार्य डॉ. के.जी कानडे, साहेबराव मेंगडे,प्रा.वंदना मंडलिक, ज्ञानशक्ती विकास वाहिनीच्या प्रतिनिधी वास्तू विशारद यशल वळसे पाटील, अनिता चौधरी, प्रा.अभिषेक भोर, प्रा.संजयकुमार पोकळे व प्रा.गणेश वाघ अग्रभागी होते.

महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांनी व पदाधिकार्यांनी केशर आंबे हातात घेऊन वृक्षलागवड व संवर्धनाबाबत जनजागृती केली.महाविद्यालयाच्या परिसारत १०० केशर आंबा लागवडीचा शुभारंभ रयत शिक्षण संस्था समन्वय समितीचे सदस्य राजाराम बाणखेले व स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य उदय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. “यापुढे महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त फळझाडे लावण्याचा उपक्रमव ठिबक सिंचन व्यवस्था केली जाईल.”असे बाणखेले यांनी सांगितले. प्रा.डॉ.संतोष शिंदे, प्रा.मारुती गुंजाळ, प्रा.डॉ सुनील पानसरे, अरुण गभाले, कचरू खळदकर, संतोष शेटे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्था पहिली.

“अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात गेल्यावर्षी पाच एकर माळरान विकसित करून ५९० केशर आंब्याची लागवड करण्यासाठी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेचे सहकार्य लाभले आहे. आजही ज्ञानशक्तीने १०० केशर आंब्याची झाडे उपलब्ध करून दिली आहेत.वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत महाविद्यालयामार्फत जनजागृतीचे काम हाती घेतले जाईल.”

बाळासाहेब बेंडे, सदस्य व्यवस्थापन समिती अण्णासाहेब आवटे महाविद्यालय

मंचर (ता.आंबेगाव) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालय अण्णासाहेब आवटे महाविद्यालय व ज्ञानशक्ती विकास वहिनी संस्था यांच्या वतीने आयोजित केलेल्या वृक्ष दिंडीत चांगला प्रतिसाद मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com