पुण्यात फिरणं म्हणजे चार सिगारेट ओढणं!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

पुणे - तुम्ही आज (सोमवार) शहराच्या विविध भागांमध्ये फिरला आहात का? उत्तर ‘हो’ असेल, तर मग तुम्ही दिवसभरात चार सिगारेट ओढल्यासारखं आहे. कारण, चार सिगारेट ओढल्याइतकी प्रदूषित हवा तुमच्या प्रत्येक श्वासातून फुफ्फुसात गेली आहे. पुण्यात सर्वांत भयंकर परिस्थिती स्वारगेट, हडपसर, सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, गणेशखिंड आणि जंगलीमहाराज रस्ता येथे होती.

Shoot! I smoke या अँड्रॉईड ॲप्लिकेशनवर जगातील कुठल्याही शहराच्या विविध भागांतील हवेत तरंगणाऱ्या अतिसूक्ष्म धूलिकणांची (पीएम २.५) ‘रिअल टाइम’ माहिती मिळते.

...असे आहे गणित!
हवेत तरंगणाऱ्या २.५ मायक्रॉन प्रतिघनमीटर आकाराचे अतिसूक्ष्म धूलिकणांचा आणि सिगारेटमधून थेट फुफ्फुसात जाणाऱ्या धुराचा संबंध या ‘ॲप’ने गणितीय पद्धतीने जोडला आहे. एक सिगारेट म्हणजे ‘पीएम २.५’चे २२ मायक्रॉन प्रतिघनमीटर प्रमाण. दिवसभरात २२ मायक्रॉन प्रतिघनमीटर प्रदूषित हवा श्‍वसनातून फुफ्फुसात जाणे म्हणजे एक सिगारेट ओढण्याच्या बरोबरीचे आहे.

शहरात गेल्या आठवड्यात दिवसाला सात ते नऊ सिगारेट ओढतील इतकी प्रदूषित हवा होती. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे हवेतील अतिसूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण काहीअंशी कमी झाले आहे. त्यामुळे हे प्रमाण चार सिगारेटपर्यंत खाली आले असल्याचेही ‘ॲप’वरून समजले. 

पीएम  हा मानवी आरोग्यासाठी सर्वांत घातक आहे. यातून विषारी वायूचे घटकही आपल्या शरीरात जातात. या प्रदूषणाचे गंभीर दुष्परिणाम आईच्या पोटातील गर्भावरदेखील होतात. या प्रदूणामुळे चयापचयाशी संबंधित आजार वाढत असून, त्वचारोग, मधुमेह, अस्थमा, स्थूलता, मतिमंदत्व अशा विकारांच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
- डॉ. मेजर मोनिका बारणे (निवृत्त), चेस्ट रिसर्च फाउंडेशन

Web Title: World Environment Day Special story