सात जागतिक आश्चर्यांची नवलाई (व्हिडिओ)

IMG-20190606-WA0046.jpg
IMG-20190606-WA0046.jpg

पुणे : पॅरिसला न जाता भारतात, अगदी पुण्यात आयफेल टॉवरसमोर उभे राहून सेल्फी काढायचा आहे का? पिसाचा कललेला मनोरा (इटली), ईजिप्तमधलं विशाल पिरॅमिड आणि जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त आश्चर्य मानल्या जाणाऱ्या अशा सात वास्तू पहायला सहकारनगरमध्ये चला

जगातल्या सात नवलाईच्या वास्तूरचना सहकारनगरधील यशवंतराव चव्हाण उद्यानात पहायला मिळतात. 'सेव्हन वंडर्स थीम पार्क' ही इथली खरी ओळख आहे. ताजमहाल, स्टोनहॅज, कोलोझियम व स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यांच्यासह सात जागतिक आश्चर्यांची सहल एकाच ठिकाणी. एकाच वेळी प्रतिकृतींच्या रूपातून घडते. 

मुळात ही बाग आहे. त्यामुळे बागेत मनमुराद खेळण्यासाठी असतात तशा जागाही दोन ठिकाणी उपलब्ध आहेतच. छोट्या मैदानात धावपळीचे खेळ खेळा किंवा ओपन जिममध्ये गमतीदार वाटणाऱ्या साधनांच्या आधारे मजेमजेत व्यायाम करा. इथल्या सुपरमॅनच्या मोठ्या कटआउटचा चेहेऱ्याचा भाग मोकळा सोडलेला आहे. त्यामागे जाऊन  उभे राहा. समोरच्या मंडळींना तुम्ही सुपर गर्ल किंवा सुपर बॉय वाटू शकता. 

बांबूचं छोटं बेट, वळसेदार वेलींचा विस्तार पाहताना मध्येच आपलं लक्ष चेंडूसारखी फळं लगडलेल्या झाडाकडे गेलं तर ती निसर्गाची नवलाईही नजर खिळवून ठेवल्याशिवाय राहणार नाही. या देशी वृक्षाचं भारतीय नाव आहे कैलासपती. इंग्रजीत याला कॅनन बॉल म्हणजे तोफेचे गोळे या नावानं ओळखलं जातं. मानवनिर्मित नवलाईबरोबरच नैसर्गिक नवलाईचाही इथं आनंद अनुभवा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com