Pune News : धक्कादायक ! पोषण आहाराच्या नावाखाली अंगणवाडीत कीड लागलेले धान्य ?

येरवडा परिसरातील महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत अंगणवाडीत शिकणाऱ्या लहान मुलाना पोषण आहार म्हणून बंद पाकिटात डाळ, चना आणि गहू देण्यात येतात मात्र या धान्याचा दर्जा एवढा निकृष्ट दर्जाचा आहे हे जयजवाननगरमधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अ.क्र १११ अंगणवाडीत स्पष्टपणे दिसून आले.
Pune News
Pune Newssakal

विश्रांतवाडी : येरवडा परिसरातील महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फत अंगणवाडीत शिकणाऱ्या लहान मुलाना पोषण आहार म्हणून बंद पाकिटात डाळ, चना आणि गहू देण्यात येतात मात्र या धान्याचा दर्जा एवढा निकृष्ट दर्जाचा आहे हे जयजवाननगरमधील एकात्मिक बाल विकास सेवा योजना अ.क्र १११ अंगणवाडीत स्पष्टपणे दिसून आले. याबाबत पीडित पालक विशाल शेलार यांनी सांगितले की लहान मुलांना दिलेलं धान्य हे गुरेढोरे यांनासुद्धा देता येणार नाही. हा एकप्रकारे पोषण आहाराच्या नावाखाली लहान मुलांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.

यावेळी पुणे शहर संघटक सहमंत्री मनोज शेट्टी, पुणे शहर उपाध्यक्ष महिला आघाडी श्रद्धा शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते गणेश घायमुक्ते आणि पीडित पालक विशाल शेलार यांनी कीड लागलेल्या धान्याची पोलखोल महिला बाल कल्याण झोन प्रोजेक्ट अधिकारी मनीषा बिरारीस, कर्मचारी व ठेकेदाराला सिद्ध करून दाखवली.

Pune News
Wagholi News : वाघोलीत केसनंदफाटा परिसरात पुणे - नगर महामार्गाची दुरवस्था ; तुटलेले चेंबरचे झाकण गायब

यासंदर्भात आपचे मनोज शेट्टी म्हणाले, 'धान्याला कीड लागल्याचे माहिती असूनही ठेकेदाराने संपूर्ण शहरात निकृष्ट दर्जाचा मालाचापुरवठा करून मुलांच्या आरोग्याशी खेळ केला आहे. एकात्मिक बालविकास विभागाच्या आशीर्वादामुळे अंगणवाड्याना निकृष्ट दर्जाच्या धान्याचा पुरवठा करण्याची मजल ठेकेदार करू शकतो. त्यामुळे. ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा. दाखल करावा, कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून काळ्या यादीत टाकावे.'

याविषयी बालविकास प्रकल्पअधिकारी (उत्तर) मनीषा बिरारीस यांच्याशी संपर्क साधला असता,त्या म्हणाल्या, 'या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठांना माहिती देऊन निकृष्ट दर्जाचे धान्य शहर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. परंतु हे धान्य त्या कुटुंबाला सप्टेंबर महिन्यात देण्यात आलेले होते. ते त्यांनी इतके माहिने तसेच ठेवल्याने किडले असेल. परंतु तरीही धान्याचा पुरवठा करणाऱ्या त्या ठेकेदाराने कीड लागलेले धान्य दिल्याने त्याचे कंत्राट रद्द करण्याची शिफारस करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com