

Food Safety Disaster at Pune University: Worms Found in Meals
esakal
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या गंभीर खेळामुळे चर्चेत आले आहे. परीक्षा विभागाजवळील ‘अनिकेत कॅन्टीन’मध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या पोह्यांमध्ये चक्क अळी आढळल्याने विद्यापीठातील अन्न सुरक्षेचा बोजवारा पुन्हा एकदा समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच विद्यापीठाच्या खानावळीमधील भाजीमध्येही अळी आढळली होती. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे विद्यापीठ प्रशासनाची निष्क्रियता चव्हाट्यावर येत आहे.