लायकी नसलेले लोक सावरकरांवर टीका करताय : विक्रम गोखले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

पुणे ः सावरकर हे पहिले व्यक्ती आहे ज्यांना हिंदुत्व समजले. संपूर्ण जग त्यांना ओळखते. मात्र त्यांचे नाव घेण्याची लायकी नसलेले लोक त्यांच्यावर टीका करीत आहेत, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी बुधवारी व्यक्त केले.

कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन तसेच कारगिल विजय दिवसाला 20 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सरहद संस्थेतर्फे "कॉफी टेबल बुक'चे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोखले बोलत होते.

गोखले म्हणाले, 'सावरकर यांच्या जयंतीची दिवशी ते नायक की खलनायक यावर चर्चा होते. अशी एकच व्यक्ती आहे ज्यांनी दलितांना जवळ करा म्हटले आहे. मुळात असा कार्यक्रम घेणा-यांना लाज वाटायला हवी. सावरकरांवर टीका करणा-यांचे नाव घेण्यात मी माझी शक्ती व वेळ खर्च करू इच्छित नाही. काश्‍मीर प्रश्‍न हा दिल्ली आणि इस्लामाबादला सुरूच ठेवायचा आहे. तेथील नागरिकांना मात्र शांतता हवी आहे. हा प्रश्‍न केवळ लढाईने सुटणार नाही. ज्यांना युद्ध हवे आहे त्यांनी इतिहासातून अनुभव घेतला नाही.'

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: worthless people criticize on Savarkar says Vikram Gokhale