Narayangaon News : पहिलवान कैलास पवार खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक; आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी

निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील नामांकित पहिलवान कैलास उर्फ पिंटू गुलाब पवार(वय 39) याचा खून करून फरार झालेला मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
wrestler kailas pawar
wrestler kailas pawarsakal

नारायणगाव - निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील नामांकित पहिलवान कैलास उर्फ पिंटू गुलाब पवार(वय 39) याचा खून करून फरार झालेला मुख्य आरोपी सुनील मारुती पवार याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला जुन्नर न्यायालयाने 9 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणातील अटक आरोपींची एकूण संख्या तीन झाली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. या गुन्ह्यातील तीनही आरोपी सख्खे भाऊ आहेत.

खून प्रकरणी रविवारी (ता.4) मंगल मारुती पवार, प्रवीण मारुती पवार( राहणार केंदूर, ता. शिरूर ) यांना अटक करण्यात आली होती.फरार मुख्य आरोपी सुनिल पवार याला मौजे लोणी गावचे हद्दीत बेल्हा जेजुरी हायवे रोडवर पारगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केली. पुढील तपासाठी त्याला नारायणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मयत व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.एक वर्षांपूर्वी लग्नाच्या वरातीत नाचत असताना कैलास पवार याचा पाय सुनील पवार याच्या पायावर पडला. तेव्हापासून या दोघांमध्ये वाद सुरू होता. याच कारणावरून शनिवारी दुपारी मांजरवाडी येथे झालेल्या बाचाबाचीत सुनील पवार याने चाकू हल्ला करून कैलास पवार याचा खून केला होता. या गुन्ह्यात त्याला त्याचे भाऊ मंगल व प्रवीण पवार यांनी मदत केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com