फिरंगाईदेवी उत्सवात रंगला कुस्त्याचा आखाडा ; पैलवान बाला रफिक ठरला मानकरी

रमेश मोरे
शनिवार, 31 मार्च 2018

प्रथमच महिलांच्या कुस्त्याचे आयोजन करण्यात आल्याने पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनांनी मोठ्या प्रमाणावर कुस्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. आखाड्याचे पूजन शेखर काटे व एस.बी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्या  मुख्य कुस्तीचे आकर्षण पै. साक्षी शेलार या महिलेने  पै. श्रध्दा भोरे यांना चितपट करत बक्षीस मिळवित महिला कुस्तीची मानकरी ठरली.

जुनी सांगवी : दापोडी (पुणे) येथील फिरंगाई देवी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत पै. बाला रफिक याने पै. संजय बोंबाळे यांच्या अटीतटीच्या लढतीत विजयश्री खेचून आणत चांदीची गदा पटकावत प्रथम विजेतेपदाचा मानकरी ठरला.

प्रथमच महिलांच्या कुस्त्याचे आयोजन करण्यात आल्याने पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनांनी मोठ्या प्रमाणावर कुस्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती. आखाड्याचे पूजन शेखर काटे व एस.बी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्या  मुख्य कुस्तीचे आकर्षण पै. साक्षी शेलार या महिलेने  पै. श्रध्दा भोरे यांना चितपट करत बक्षीस मिळवित महिला कुस्तीची मानकरी ठरली. तर पै. प्रगती गायकवाड व पै. सावरी सातकर यांची अटीतटीची कुस्ती बरोबरीत सुटल्याने बक्षीस दोघींना विभागून देण्यात आले. तिसरी कुस्ती पै.अक्षदा वाळुंज हिने पै.शितल कोळेकर आसमान दाखवून विजय मिळवला.

प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेल्या पै.बाला रफीक यास नगरसेवक रोहित आप्पा काटे यांच्यातर्फे चांदीची गदा देण्यात आली. याचबरोबर पै.सुशांत फेंगसे याने पै.शाम किंडरे यांच्या अतीतटीच्या कुस्तीमध्ये पै.सुशांत फेंगसे याने बाजी मारत चांदीची गदा मिळविली. पै.संतोष नखाते याने पै.आकाश नांगरे यास चितपट करून बक्षीस मिळविले. पै.रोहित कलापुरे याने पै.आकाश काळभोर यास चितपट करून बक्षिस मिळविले.

पै.निखिल नलावडे व पै.सिकंदर जाधव यांची कुस्ती बरोबरीने सुटली त्यांना बक्षीस विभागून देण्यात आले. यात लहान मुलांच्या कुस्त्या व विविध वजनी गटातील २५० पैलवानांच्या कुस्त्या झाल्या. यामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरून पैलवान कुस्तीसाठी आले होते.

यावेळी पंच म्हणून पै.वसंत मते, पै.सुरेश काटे, पै.शिवाजी काटे,पै.प्रल्हाद काटे,पै.शंकर जम यांनी काम पाहिले मुख्य कुस्तीचे पंच म्हणून पै.मोहन खोपडे यांनी काम पाहिले.

यावेळी उपस्थित सिंगापूर एशियन योगा सुवर्ण पदक विजेती, श्रेया कंदारे,पै.प्रभाकर बुचडे,पै.किशोर नखाते( युवा महाराष्ट्र केसरी)यांचा उत्सव समितीच्या वतीने शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. फिरंगाई उत्सव कमिटीचे अध्यक्ष वसंत काटे, उत्सव प्रमुख विजय किंडरे, सेक्रेटरी ज्ञानेश्वर भाडाळे ,खजिनदार आदेश काटे,संतोष काटे, समस्त उत्सव कमिटी रोहित काटे,,राजाभाऊ बनसोडे व असंख्य कुस्ती प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवान काटे यांनी केले.

Web Title: Wrestling Competition Wrestler Bala Rafik won