Yashwant Sugar Factory Election : "यशवंत' साठी मांजरी-फुरसुंगी गटातील दोन जागांसाठी २७ अर्ज

सुरुवातीला उदासिनता दिसत असलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अनेक पुढाऱ्यांनी रस घेतला आहे. त्यामुळे मांजरी-फुरसुंगी गटातील दोन जागांसाठी तब्बल २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
Yashwant Sugar Factory Election
Yashwant Sugar Factory ElectionSakal

मांजरी : सुरुवातीला उदासिनता दिसत असलेल्या थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अनेक पुढाऱ्यांनी रस घेतला आहे. त्यामुळे मांजरी-फुरसुंगी गटातील दोन जागांसाठी तब्बल २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

यशवंत साखर कारखाना बंद पडल्यानंतर तब्बल बारा वर्षांनी प्रशासकाकडून निवडणूक कार्यक्रम लावला आहे. २१ जागासांठी सहा सर्वसाधारणसह अकरा विविध मतदारसंघातून ३२० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

कारखाना स्थापनेपासून कारखान्यावर मांजरी, फुरसुंगी, शेवाळेवाडी, हडपसरचा मोठा प्रभाव राहिला आहे. मोठ्या खंडानंतर होत असलेल्या सध्याच्या या निवडणूकीतही हा प्रभाव पाहायला मिळणार आहे.

मांजरी-फुरसुंगी या गट क्रमांक चार मध्ये दोन सर्वसाधारण जागांसाठी १९ उमेदवारांनी २७ अर्ज दाखल केले आहेत. अर्ज माघारीनंतर येथील लढत स्पष्ट होऊन रंगत येणार आहे.

मांजरी-फुरसुंगी गट क्रमांक चार मधून आलेले अर्ज

यशवंतचे माजी संचालक राजीव घुले, सुरेश घुले, माजी उपसरपंच सुधीर घुले, राहूल घुले, वसंत शेवाळे, प्रदीप घुले, माजी नियोजन समिती सदस्य अमोल हरपळे,

माजी जिल्हापरिषद सदस्य संजय गायकवाड माजी पंचायत समिती सदस्य दिनकर हरपळे, राहुल चोरघडे, किरण हरपळे, सुरेश कामठे, शामराव खुटवड, सागर हरपळे, विजय गायकवाड, शंकर हरपळे, महादेव कामठे, अनिल टिळेकर, दामोदर गायकवाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com