'वितंडवाद जरूर करावा; पण विसरूनही जावा'

'वितंडवाद जरूर करावा; पण विसरूनही जावा'

पुणे - आयुष्यात वितंडवाद मौलिक असतो. प्रत्येकाने वितंडवाद जरूर करावा आणि विसरूनही जावा. यातून वेळ चांगला जातो आणि खर्चही लागत नाही आणि आरोग्यही चांगले राहते, असा आरोग्याचा मूलमंत्र ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस यांनी दिला.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. २५) कै. मुकुंद गोखले स्मृती ‘यशवंत-वेणू पुरस्कार’ वितरण सोहळ्यात फडणीस बोलत होते. हा पुरस्कार फडणीस आणि बालसाहित्यकार शकुंतला फडणीस यांना ९८ व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

या वेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपाध्यक्ष दीपक रेगे, निर्माते समीर हंपी, महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख एस. डी. लायगुडे, कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, सहकार्यवाह सत्यजित धांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी, तर आभार सत्यजित धांडेकर यांनी मानले.

कलावंतांची कदर असणाऱ्या यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नीच्या नावे मिळालेला पुरस्कार मी नम्रपणे स्वीकारते. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हटले जाते. विशेषतः ती पत्नीच असते.
-शकुंतला फडणीस, बालसाहित्यकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com