पुणे : एनडीएच्या धोरणामुळे यात्रेकरुची अडचण

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

एनडीएने दुसऱ्या दिवशी त्यांना नैवद्य दाखविण्यास एकत्र सोडणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे, लांब राहणारे यात्रेकरू निघून गेले. राहिले त्यांच्या साठी भगवान मोरे, शिवाजी चव्हाण यांच्या शेतात त्यांना नैवद्य करण्यास जागा दिली. कोंढवे-धावडेचे सरपंच नितीन धावडे यांनी त्यांनी पाणी पुरवठा केला. यापुढे त्यांना विविध कामांसाठी सहकार्य करणार. असे त्यांनी सांगितले.  

उत्तमनगर : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) च्या सुरक्षा रक्षकांनी धनगरबाबाच्या यात्रेसाठी आलेल्या  यात्रेकरूंवर केलेल्या लाठी हल्ल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे युवकाचे शहराध्यक्ष उमेश कोकरे यांनी दिली. 

श्रीधनगरबाबाचा दरवर्षी चैत्र पौर्णिमेला या 2 दिवसाचा उत्सव असतो. हे ठिकाण राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या हद्दीत आहे. यात्रेसाठी, दौंड, बारामती, माढा, कल्याण, ठाणे येथून धनगर समाज आपल्या कुलदैवताचा वार्षिक कुलाचारासाठी आले होते. त्यांना शनिवारची परवानगी होती. त्यांच्यावर शनिवारी रात्री देवाला गोड नैवद्य दाखविण्याची तयारी सुरू असताना अचानक राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) च्या सुरक्षा रक्षकांनी लाठी हल्ला केला. त्यांना बाहेर आणून सोडले. त्यांची उत्तमनगर येथील बाजार समितीच्या गाळयामध्ये झोपण्याची व्यवस्था केली होती. सकाळी त्यांची नाश्त्याची व्यवस्था कोकरे यांनी केली होती. 

एनडीएने दुसऱ्या दिवशी त्यांना नैवद्य दाखविण्यास एकत्र सोडणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे, लांब राहणारे यात्रेकरू निघून गेले. राहिले त्यांच्या साठी भगवान मोरे, शिवाजी चव्हाण यांच्या शेतात त्यांना नैवद्य करण्यास जागा दिली. कोंढवे-धावडेचे सरपंच नितीन धावडे यांनी त्यांनी पाणी पुरवठा केला. यापुढे त्यांना विविध कामांसाठी सहकार्य करणार. असे त्यांनी सांगितले.  

धनगरबाबाचा पुजेच्या वेळी उत्तमनगर सहायक पोलिस निरीक्षक बापू पिंगळे, भाजपचे ब्लॉक अध्यक्ष अभिजित धावडे, कुबेर मोरे, नीलेश धावडे, शिवाजी चव्हाण, निखिल मोरे हे  उपस्थित होते.

Web Title: yatra in Uttamnagar