Navratri Festival: गरबा-दांडियाही झाला डिजिटल; यंदा गरबा स्पर्धा होणार ऑनलाईन

Dandiya
Dandiya

Navratri Festival: पुणे : नवरात्र उत्सव म्हटलं की 'ओढणी ओढूने उडी उडी जाय'....सारख्या वेगवेगळ्या गाण्यांच्या तालावर गरबा आणि दांडिया खेळणारी तरुणाई... शहरातील विविध लॉन्स आणि कार्यालयांमध्ये आयोजित स्पर्धा तसेच यात उत्साहाने भाग घेणारे नागरीक हे चित्र दिसून येते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्साह साध्यापणाने साजरा होत असल्याने अनेकांनी खंत व्यक्त केली आहे. तर काही संस्थांनी डिजिटल माध्यमाचा वापर करून स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांना अद्याप परवानगी नसल्याने काही संस्थांनी हे कार्यक्रम रद्द केल्याचे सांगितले.

दरवर्षी शहरात नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोष आणि उत्साहात साजरा केला जातो. शहरातील वेगवेगळ्या लॉन्स, महाविद्यालयातील ग्राऊंड, चौक किंवा सोसायटींमध्ये संपूर्ण नऊ दिवस दररोज सायंकाळी गरबा-दांडिया आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामध्ये युवक वर्गाचा मोठ्या संख्येने सहभाग असतो. सिंगल सामूहिक नृत्य असो किंवा कपल डान्स अशा सगळ्याच प्रकारच्या स्पर्धांची चर्चा महिनाभर अगोदरच सुरू असते. नवरात्रीचा उत्सव, आरती ऑनलाईन पद्धतीत होत असल्याने आता डिजिटल पद्धतीत गरबा आणि दांडियाचा कार्यक्रम होत आहे. 

याबाबत नृत्य प्रशिक्षक प्रिया चुटके म्हणाल्या, "प्रत्येक वर्षी गरबा आणि दांडियाच्या स्पर्धेत मला परीक्षक म्हणून बोलविण्यात येते. तसेच नृत्य प्रशिक्षक असल्यामुळे आम्ही नवरात्रीत गरब्यासाठी विशेष वर्कशॉप ठेवतो. यावर्षी आम्ही वर्कशॉप तसेच या स्पर्धा ऑनलाईन ठेवल्या आहेत. तसेच नागरिकांना त्यांचे गरबा किंवा दांडियाचे विडिओ पाठवण्यास सांगत आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून विजेत्यांची निवड केली जाणार आहे. 

गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही दांडिया नाईट्सचा भव्य कार्यक्रम आयोजित करतो. परंतु कोरोनामुळे आम्हाला यावर्षी पोलीस परवानगी मिळाली नाही.  तसेच यंदा कित्येक व्यवसायांना फटका बसल्याने या कार्यक्रमासाठी आम्हाला निधी देखील मिळवणे अवघड झाले. त्यामुळे यावर्षी कोणताही कार्यक्रम ठेवणार नसल्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये पहिल्यांदा हे कार्यक्रम रद्द झाल्याचे कार्यक्रमाचे आयोजक आणि 'फ्रेंड्स ग्रुप'चे सदस्य अमित कलापुरे आणि अभिषेक तोडकर यांनी सांगितले.

"आमच्या सोसायटीमध्ये सर्व सण साजरे केले जातात. त्यात नवरात्रौत्सव तर उत्साहात पार पाडतो. सोसायटीतील सर्व सदस्य मिळून गरब्याचा आनंद घेतो. यावर्षीही आम्ही हा कार्यक्रम करू पण तोही साधेपणाने."
- आशा वागज, गृहिणी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com