esakal | आता कांदा आणणार डोळ्यात पाणी; जुन्या कांद्याच्या दराने गाठला उच्चांक!
sakal

बोलून बातमी शोधा

Onion

मार्केट यार्डातील कांदा विभागात पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या भागातून 40 ट्रक जुन्या कांद्याची आवक झाली. त्यातील 60 टक्के कांद्याचा दर्जा खालावला आहे, तर 30 टक्के कांदा चांगल्या प्रतीचा आहे.

आता कांदा आणणार डोळ्यात पाणी; जुन्या कांद्याच्या दराने गाठला उच्चांक!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड : कांदा उत्पादित क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे राज्यातील नवीन कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच नवीन कांद्याचा हंगामही लांबणीवर पडला आहे. तर दुसरीकडे दक्षिण भारतातून कांद्याची मागणी वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून घाऊक बाजारात जुन्या कांद्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. चांगल्या प्रतीच्या कांद्याला घाऊक बाजारात 10 किलोला 550 ते 620 रूपये दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारातही किलोच्या दर 70-80 रुपयांवर  गेले आहेत.

NEET 2020 : विद्यार्थ्यांना 'मराठी' नकोशी; परीक्षा देणाऱ्यांची संख्या घटली पाच पटीनं!​

सध्या बाजारात नवीन कांदा आता बाजारात येणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे 50 टक्‍के नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. डिसेंबर महिन्यात नवीन कांदा बाजारात येईल. जुना कांदा तुलनेने कमी उपलब्ध आहे. असलेल्या मालापैकी 60 ते 70 टक्के माल नित्कृष्ट दर्जाचा आहे. बाजारात चांगल्या मालाला मागणी आहे. दोन महिन्यांपूर्वी कांद्याची घाऊक बाजारात 15 ते 20 रुपये किलो भावाने विक्री होत होती. मात्र, जास्त प्रमाणात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले.

पुण्याच्या 'मिनिएचर आर्टिस्टने साकारली अवघ्या तीन मिलिमीटरची विठ्ठलाची मूर्ती​

मार्केट यार्डातील कांदा विभागात पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या भागातून 40 ट्रक जुन्या कांद्याची आवक झाली. त्यातील 60 टक्के कांद्याचा दर्जा खालावला आहे, तर 30 टक्के कांदा चांगल्या प्रतीचा आहे. चांगल्या प्रतीच्या 10 किलो कांद्याला 550 ते 620 रूपये दर मिळाला. तसेच हलक्या प्रतीच्या कांद्याला 400 ते 550 रूपये दर मिळाला. श्रीगोंदा परिसरातून नवीन कांद्याच्या 300 पिशव्यांची आवक झाली. मात्र हा कांदा हलक्या प्रतीचा आहे. त्यामुळे 10 किलोला 200 ते 350 रूपये दर मिळाला असल्याचे व्यापारी गणेश यादव यांनी सांगितले. 

सुप्रीम कोर्टमध्ये निघाली भरती; ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!​

कांदा दर वाढीची कारणे :-
- दक्षिण भारतातून कांद्याची मागणी वाढली.
- कांदा उत्पादित क्षेत्रात अतिवृष्टी
- तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध असलेला जुना कांदा
- शहरातील हॉटेल, खानावळी, विविध खाद्यपदार्थ विक्री केंद्र सुरू
- कांद्याचे ५० टक्के नुकसान
- बाजारात आलेला 60 ते 70 टक्के कांदा नित्कृष्ट दर्जाचा
- नोव्हेबरमध्ये सुरू होणारा कांद्याचा हंगाम यंदा तो डिसेंबरमध्ये सुरू होईल.

घाऊक बाजारातील ऑक्टोबरमधील दर :- 

वर्ष दर
2017 15 ते 20 रूपये
2018 30 ते 40 रूपये
2019 40 ते 50 रूपये
2020 50 ते 70 रूपये

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)