पुणेकरांनो, यंदा श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे प्रत्यक्ष दर्शन नाही!

This year Online Darshan of Bhau Rangari Ganpati
This year Online Darshan of Bhau Rangari Ganpati

पुणे :  यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करत असताना उत्सवावर काही मर्यादा आल्या आहेत. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत आणि मर्यादांवर मात करत हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्यावतीने 129 व्या वर्षानिमित्त पुण्यासह जगभरातील गणेशभक्तांसाठी पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. तसेच, यंदा भाविकांना श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही आणि पुष्पहार अर्पन करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब निकम, सचिव दिलीप आडकर, विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

बालन म्हणाले, "श्री गणरायांचे आगमन हा आनंदाचा, उत्साहाचा, समाजात नवचैतन्य निर्माण करणारा उत्सव आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे समाजात सध्या काही प्रमाणात निराशेचे वातावरण निर्माण झालेले आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाबरोबर वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. पुणे ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्याने जगाला सार्वजनिक गणेशोत्सव दिला, त्या गणेशोत्सवाची ओळख विधायक कार्यासाठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस, महापालिका प्रशासन यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ट्रस्टच्या वतीने विधायकतेला आधुनिकतेची जोड देत गणेशोत्सवानिमित्त पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे."

प्रवाशांनो, लोहगाव विमानतळावरून रात्रीच्या फ्लाईट्स बंद, कारण...

"दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात देश विदेशातील गणेशभक्त येत असतात, शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. परंतु यंदा हे चित्र बघायला मिळणार नाही, या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पहिल्या ऑनलाईन सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवामध्ये सुप्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांची वैविध्यपूर्ण संगीत मैफल अनुभवायला मिळणार आहे. शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या खास गायकीचा आनंद रसिकांना घेता येणार आहे. आंतराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे, बासरीच्या मंजुळ स्वरांनी रसिकांना मोहित करणारे प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरसिया यांची जुगलबंदी अविस्मरणीय ठरणार आहे. याशिवाय सुप्रसिद्ध गायक, संगीतकार डॉ. सलिल कुलकर्णी यांची सुगम व मेलडियस गाण्यांची श्रवणीय मैफल रंगणार आहे."

लोककलावंत नंदेश उमप आणि गणेश चंदनशिवे हे या सांस्कृतिक महोत्सवात लोककलेचे, लोकगीतांचे विविध रंग उलगडणार आहेत. लिटिल चॅम्प' फेम युवा गायक प्रथमेश लघाटे, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी यांची सुरेल मैफल गणेशभक्तांची मने जिंकणारी ठरेल. तसेच महोत्सवामध्ये पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, दिग्दर्शक प्रविण तरडे आणि संगीतकार अजय अतुल यांच्या मुलाखतीमधून गणेशोत्सव उलगडणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे, भार्गवी चिरमुले, मिलिंद कुलकर्णी आणि विनोद सातव करणार आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com