वारकरी बांधवांनो, यंदा 'अशी' करा विठ्ठलाची वारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व भाविकांना वारी घडवण्याची मोठी जबाबदारी फेसबूक दिंडीच्या सर्व सहकाऱ्यांवर आहे. यासाठी फेसबुक दिंडीचे मंगेश मोरे, सुरज दिघे, अमित कुलकर्णी, ओकार मरकळे, राहूल बुलबुले, अमोल निंबाळकर, ओंकार महामुनी, सुमित चव्हाण, अमोल गावडे, संतोष पाटील हे अहोरात्र काम करत आहेत. असे मोरे यांनी सांगितले.

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी पंढरीची वारी होईल की नाही या बाबत सध्या निर्णय झालेला नाही. दरवर्षी लाखोंच्या संख्येत आषाढी पालखी सोहळ्यात भाग घेणाऱ्या वारकऱ्यांवर यंदा कोरोनामुळे निर्बंध येण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून सर्व वारकरी या वारीची परंपरा टिकवून आहेत. परंतु या वर्षी या पायी पालखी सोहळ्यावर मर्यादा आणत काही ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पाडू शकतो. दरम्यान या संकटाच्या काळात वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन घडवून आणण्याचा नवा उपक्रम फेकबूकच्या माध्यमातून केला जाणार आहे. यासाठी स्वप्नील मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फेसबूक दिंडीच्या माध्यमातून 'माझ्या आठवणीतील वारी' हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

आणखी वाचा- पुण्याच्या सुपर आजीबाईंना, कोरोनाला हरवले

या उपक्रमाच्या माध्यमातून वारकरी आपले अनुभव सांगू शकतात. या वर्षी लॉकडाऊन आणि कोरोनामुळे अनेकांना इच्छा असूनही पंढरीच्या वारीला जाता येणार नाही. 'माझ्या आठवणीतली वारी' या उपक्रमा अंतर्गत वारकरी त्यांचे वारीतले अनुभव कथन करणार आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना पायी वारी करणं शक्य होणार नाही. अशावेळी 'व्हर्च्युअल वारी' हा उत्तम पर्याय ठरू शकतो. व्हर्च्युअल वारीच्या माध्यमातून 'ई - वारकऱ्यांना' वेळोवेळो वारीची माहिती मिळण्यास मदत होईल. अशी माहिती तुकाराम महाराजांच्या 11व्या पिढीतील वंशज असलेल्या व फेसबूक दिंडीचे संस्थापक स्वप्नील माेरे यांनी दिली.

पुण्यात बघता बघता येरवडा परिसर बनला कंटेन्मेंट झोन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व भाविकांना वारी घडवण्याची मोठी जबाबदारी फेसबूक दिंडीच्या सर्व सहकाऱ्यांवर आहे. यासाठी फेसबुक दिंडीचे मंगेश मोरे, सुरज दिघे, अमित कुलकर्णी, ओकार मरकळे, राहूल बुलबुले, अमोल निंबाळकर, ओंकार महामुनी, सुमित चव्हाण, अमोल गावडे, संतोष पाटील हे अहोरात्र काम करत आहेत. असे मोरे यांनी सांगितले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

"यंदा 'फेसबूक दिंडी'चे दहावे वर्ष असून मागील नऊ वर्षांतील सर्व छायाचित्र आणि चालचित्रांचा वापर करून वारीचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचा प्रयत्न यंदा करणार आहोत. 'माझ्या आठवणीतील वारी' हा या वर्षीचा मुख्य उपक्रम असून त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर यावर्षी होणाऱ्या वारीचे क्षणचित्रे सुद्धा फेसबूक दिंडीच्या माध्यमातून दाखवले जातील.'' 

- स्वप्नील मोरे संस्थापक फेसबुक दिंडी

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

'माझ्या आठवणीतील वारी'च्या माध्यमातून वारीत चालणारे वारकरी सांगणार त्यांच्या आठवणीतील वारी
''गेल्या नऊ वर्षांपासून 'फेसबूक दिंडी' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये लाखो वारकऱ्यांपर्यंत वारीचे क्षणचित्रे पोहचवली जातात. तसेच सामाजिक बांधिलकी जपत वारीच्या काळात वेगवेगळे सामाजिक उपक्रमही राबवले जातात. 'माझ्या आठवणीतील वारी' उपक्रमा अंतर्गत फेसबुक दिंडीकडे असलेल्या नऊ वर्षांचे चलचित्र व क्षणचित्र त्यातून वारीतले क्षण पुन्हा निर्माण करण्याचं ठरविण्यात आले आहे. त्यामुळे वारकऱ्यांना घरबसल्या वारीचा अनुभव मिळेल. तसेच या उपक्रमात वारीत चालणारा वारकरी आणि कलेचा वारकरी असणारे कलाकार ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वारी अनुभवली आहे, ते सर्व आपले अनुभव कथन करणार आहेत. याचबरोबर प्रेक्षक सुद्धा आपले वारीतील फोटो, व्हिडीओ टीम ला पाठवू शकतात. तरुणांपासून ते जेष्ठ वारकरी यातून आपले वारीतील अनुभव सांगणार आहेत.

राज्यात उद्योग चक्र सुरु: उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली ही महत्वाची माहिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year virtual Waari will be organised with help of facebook