Metro Station : येरवड्यात मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग चारचाकीवर कोसळला

येरवडा येथे काम सुरू असलेल्या मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग स्टेशन खालून जाणाऱ्या एका चारचाकीवर कोसळला.
yerwada accident
yerwada accidentsakal

वडगाव शेरी - येरवडा येथे काम सुरू असलेल्या मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग स्टेशन खालून जाणाऱ्या एका चारचाकीवर कोसळला. त्यामुळे चारचाकीचे नुकसान झाले. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. कायमच मोठी वर्दळ असलेल्या येरवडा चौकात ही घटना घडल्यामुळे महामेट्रोने येथे केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महा मेट्रोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी घडलेल्या घटनेबाबत दुजोरा दिला असून, नेमकी ही घटना कशामुळे घडली याची चौकशी सुरू असल्याचे त्रोटक उत्तर दिले आहे.

ही घटना गुरुवारी सायंकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी येरवडा चौकात मोठी गर्दी होती. चारचाकीवर उंचावरून मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग अचानक कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या कारची काच फुटली तसेच वरचे छतही दबले. सुदैवाने घटनेवेळी त्या ठिकाणी नागरिक नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

यावेळी प्रत्यक्षदर्शी अफजल खान म्हणाले, मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग कारवर पडला त्यावेळेस तेथे जर नागरिक असते तर दुर्दैवी घटना घडली असती. महा मेट्रोने येरवडा येथे सुरू असलेल्या स्टेशनच्या कामाचे संपूर्ण सुरक्षा ऑडिट करावे तसेच कामाच्या दर्जाची तपासणी करावी. या घटनेला नेमका कोणाचा निष्काळजी कारणीभूत आहे याची चौकशी करून कारवाई करावी. नागरिकांचा जीव अमूल्य आहे.

महा मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्हणाले, येरवडा येथे महा मेट्रोच्या स्टेशनचे काम सुरू आहे. घटना नेमकी कशामुळे घडली. कोण जबाबदार. किती नुकसान झाले या ची पाहणी करण्यासाठी अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आहेत.

आम्ही सदर ठिकाणी सुरक्षेच्या उपायोजना केलेल्या आहेत. असे असतानाही नेमके काय घडले हे चौकशी केल्यानंतर कळेल. सध्या तरी ही घटना घडली या व्यतिरिक्त कोणतीही माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com