

Injured prisoner dies during treatment at Sassoon Hospital
Sakal
पुणे : येरवडा कारागृहात सराईत गुन्हेगार असलेल्या दोन कैद्यांनी मिळून केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कैद्याचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात शुक्रवारी मृत्यू झाला. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.