Pune Crime : धक्कादायक! येरवड्यात अंगावर रॉकेल ओतून रिक्षाचालकाला पेटवून दिले; दोघांवर गुन्हा दाखल

आरोपी महिलेसह साथीदाराला अटक
pune crime
pune crimeSakal

विश्रांतवाडी : वैयक्तिक वादातून महिलेने साथीदाराच्या मदतीने एका रिक्षाचालकाला पेटवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना येरवड्यातील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथे नुकतीच घडली. या घटनेत मुकेश सुरेश राजपूत (वय 42, रा. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, येरवडा) हे भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी उज्वला दत्तात्रय कांबळे (वय 44, रा. महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, येरवडा) व तिचा साथीदार राजेश जगताप (वय 55, रा. शास्त्रीनगर, येरवडा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश राजपूत व उज्वला कांबळे गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र राहतात.

pune crime
Pune Crime: शिवाजीनगर परिसरात नदीत सापडला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; शहर परिसरात खळबळ

25 जुलै रोजी त्यांच्यात काही कारणावरून वाद-विवाद झाले. यामध्ये उज्वला यांनी मुकेश यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

pune crime
Pune Crime: पैसे परत न केल्यानं सावकाराने पतीपुढेच पत्नीवर केला बलात्कार, पुण्यातील खळबळजनक घटना

फिर्यादी यांच्या तक्रारीवरून उज्वला कांबळे व तिचा साथीदार राजेश जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्वला कांबळे व राजेश जगताप या दोन्ही आरोपींना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयदीप गायकवाड करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com