Fire : येवलेवाडी, महंमदवाडी, हडपसरमध्ये घडल्या आगीच्या घटना

येवलेवाडीतील पानसरेनगर येथे एका इमारतीमध्ये प्रवेश करत असताना चालू चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. या घटनेत मोटार जळून खाक झाली.
Four Wheeler Fire
Four Wheeler FireSakal

कोंढवा - येवलेवाडीतील पानसरेनगर येथे एका इमारतीमध्ये प्रवेश करत असताना चालू चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. या घटनेत मोटार जळून खाक झाली. घटनास्थळी कोंढवा बुद्रुक अग्निशमन दलाची वाहने दाखल झाल्यानंतर जवानांनी पाण्याचा मारा करुन आग पूर्णपणे आटोक्यात आणली. या घटनेत कोणीही जखमी किंवा जिवितहानी झाली नाही.

आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. ही घटना सकाळी पाट वाजण्याच्या सुमारास घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी तांडेल सोपान कांबळे, वाहनचालक योगेश जगताप, फायरमन तेजस खरिवले, अर्जुन यादव यांनी प्रयत्न केले.

त्याचबरोबर, पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास महंमदवाडीतील तरवडे वस्ती येथे ०७ दुचाकींना आग लागली. अग्निशमन दलाच्या काळेबोराटेनगर अग्निशमन केंद्रातून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहणी केली असता, स्थानिक रहिवाशांनी पाणी मारुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करुन आग पुर्णपणे आटोक्यात आणली. आगीत ४ दुचाकी वाहनांचे पुर्ण तर ३ दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले.

हडपसरमधील, हांडेवाडी चौकात एका फर्निचरच्या दुकानात आग लागली होती. सदर ठिकाणी कोंढवा बुद्रुक, काळेबोराटे नगर आणि कात्रज व मुख्यालयातून दोन पाण्याचे टँकर रवाना करण्यात आले होते. जवानांनी चारही बाजूने आगीवर पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली.

तसेच, शेजारीच असलेल्या एका हॉटेलमध्ये आगीची झळ बसली असता ती आग जास्त प्रमाणात पसरु नये याची खबरदारी घेत तीन एलपीजी सिलेंडर बाहेर काढले. या आगीमध्ये दोन दुचाकी पुर्ण जळाल्या असून आगीचे कारण समजू शकले नाही. यामध्ये कोणीही जखमी झाले नाही वा जिवितहानी नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com