डिझाइन तज्ज्ञांचा तरुणाईशी संवाद

डिझाइन तज्ज्ञांचा तरुणाईशी संवाद

पुणे - ""प्रत्येक डिझाइन काहीतरी सांगत असते. लोकांच्या अनुभवांवर आधारित आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला भावणारे डिझाइन्स तयार करायला हवेत. तरुणाईच्या संकल्पनेतील नावीन्यपूर्ण डिझाइनमुळे या क्षेत्राला नवा आयाम मिळू शकेल,'' असा सल्ला डिझाइन तज्ज्ञ नरेंद्र घाटे यांनी शुक्रवारी दिला. 

"सकाळ'च्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या (यिन) "यिन फेस्ट'मध्ये डिझाइन क्षेत्राविषयी तरुणाईशी संवाद साधणाऱ्या "यिन टॉक' कार्यक्रमाच्या शृंखलेंतर्गत आयोजित संवाद सत्रात ते बोलत होते. कर्वेनगर येथील डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वुमेनमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी डिझाइन क्षेत्रातील बदलते प्रवाह व संधींविषयी मार्गदर्शन केले. फॅशन डिझायनिंग तज्ज्ञ करिश्‍मा शहानी खान यांनीही फॅशन डिझायनिंगबाबत संवाद साधला. 

"सकाळ'च्या संचालिका मृणाल पवार, एलिफंट डिझाइनच्या संचालिका अश्‍विनी देशपांडे, प्राचार्य डॉ. अनुराग कश्‍यप, डॉ. शुभदा कमळापूरकर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.चे प्रतिनिधी जॉन गोन्साविल्स, सायली अंधारे आणि "यिन'च्या कम्युनिटी नेटवर्कचे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी उपस्थित होते. कश्‍यता भाटिया यांनी सूत्रसंचालन केले. 

मनाला भिडणारे डिझाइन्स हवेत - नरेंद्र घाटे 
एखादे डिझाइन तयार करताना त्यातील संशोधन महत्त्वाचे असते. लोकांना आवडेल आणि भावेल अशा डिझाइन तयार करण्यावर भर द्यावा. असे डिझाइन्स लोकांच्या मनाला भिडतात. कोची मेट्रो प्रकल्प तयार करताना त्यात लोकांचे अनुभव जाणून घेण्यासह आम्ही त्याच्या डिझाइनमध्ये नावीन्यता आणण्याचा प्रयत्न केला. मेट्रोसाठीचे डिझाइन बनवताना आम्हाला सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागला. 

फॅशन हा जबाबदारीपूर्ण व्यवसाय - करिश्‍मा खान  
प्रत्येक फॅशनही आपल्या जीवनाशी निगडित असते. त्यामुळेच आपले व्यक्तिमत्त्व खुलते. त्यामुळे या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांनी आहे त्या गोष्टींचा वापर करत नवीन फॅशन तयार केली पाहिजे. छोट्या-छोट्या गोष्टींमधून आपण नवीन फॅशन तयार करू शकतो. मीही त्यावरच भर देत आले आहे. आज फॅशन डिझायनिंग फक्त ब्यूटिक काढण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. त्याला ग्लोबली एक वेगळे रूप मिळत आहे. 

संयुक्त प्रायोजक - सृजन कॉलेज ऑफ डिझाइन, पुणे 
सहप्रायोजक - लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड 
स्थळ प्रायोजक - डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर फॉर वुमेन, कर्वेनगर 
पुढील कार्यक्रम मंगळवारी 

"यिन' आयोजित "यिन टॉक' संवाद सत्रातील पुढील कार्यक्रम मंगळवारी (ता. 4) होणार आहे. पिंपरी-चिंचवड येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर अँड डिझाइनमध्ये हा कार्यक्रम होईल. अधिक माहितीसाठी 9075007958 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com