'योग केंद्रांमध्ये हास्ययोगींना घेणार '

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

पुणे - बदलती जीवनशैली, तणावामुळे उद्‌भवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी हास्ययोग उपयुक्त ठरते. पुण्यातही हास्ययोग चळवळ मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. ही चळवळ अधिक सक्षम व्हावी, यासाठी महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या योग केंद्रामध्ये हास्यप्रेमींनादेखील समाविष्ट करून घेऊ, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले. 

लोकमान्य हास्ययोग परिवारातर्फे जागतिक हास्ययोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात टिळक यांच्या हस्ते संगीता चाबुकस्वार यांना "हास्ययोग भूषण' पुरस्कार प्रदान करण्यात आला. हास्ययोगी डॉ. माधव म्हस्के, परिवाराचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुभाष देसाई, कार्याध्यक्ष बंडोपंत फडके, सचिव पुष्पा भगत, मीना पुरंदरे, डॉ. जयंत मुळे, शुभश्री देसाई, पुष्पा जोशी आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. म्हस्के यांनी "हास्ययोगातून आरोग्य' या विषयावर मार्गदर्शन केले. परिवाराच्या शाखांतर्फे हास्यप्रकारांचे सादरीकरणही करण्यात आले. 

टिळक म्हणाल्या, ""पुणेकरांनी एखादी गोष्ट मनावर घेतली, तर ते किती चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि त्या गोष्टीला किती अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातील हास्ययोग चळवळ आहे. शहरातील अनेक हास्यप्रेमी यासाठी विनामूल्य कार्य करीत आहेत. यातून अनेक नागरिकांना लाभ मिळत आहे.'' 
डॉ. प्रसाद आंबीकर यांनी सूत्रसंचालन केले. पुष्पा भगत यांनी आभार मानले.

Web Title: yoga centers