बारामतीत योग दिवस उत्साहात साजरा

मिलिंद संगई
गुरुवार, 21 जून 2018

बारामती - आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त आज बारामतीत विविध संस्था व संघटनांच्या वतीने योगशिबीरांचे आयोजन केले गेले. विद्यानगरीमध्ये एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया तसेच विद्या प्रतिष्ठानच्या वतीने योग शिबीर झाले. यात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह, शिक्षक, प्राध्यापक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

योगा शिक्षक कल्पना शेलार, ज्ञानेश्वर पवार, संगीता भोसले यांच्यासह नातू नेटवे, नीलीमा तावरे, अजित शेलार, पारस बाबर, सुनीता जाधव, साधना खोमणे, कैलास शितोळे यांनी योगासने कशी करायची या बाबत प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. या शिवाय ओंकार साळुंके, वेदिका जोशी यांनी योगाची माहिती दिली. या सर्व मान्यवरांच्या विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार रमणिक मोता व रजिस्ट्रार श्रीश कंभोज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या शिवाय विविध शाळा व महाविद्यालयांसह शासकीय कार्यालयातूनही आज योगदिनानिमित्त योगशिबीर पार पडले. 

Web Title: Yoga Day Celebrated in Baramati