आरोग्य संतुलनासाठी पुणेकर आज करणार योग दिन साजरा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

पुणे - आरोग्य संतुलनासाठी आणि शरीर स्वास्थासाठी हजारो पुणेकर उद्या (ता.21) एकत्र येऊन योग दिन साजरा करणार आहेत. त्यासाठी शाळा- महाविद्यालये आणि संस्था-संघटनांनी जय्यत तयारी केली आहे.

पुणे - आरोग्य संतुलनासाठी आणि शरीर स्वास्थासाठी हजारो पुणेकर उद्या (ता.21) एकत्र येऊन योग दिन साजरा करणार आहेत. त्यासाठी शाळा- महाविद्यालये आणि संस्था-संघटनांनी जय्यत तयारी केली आहे.

योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचावे, यासाठी शाळा-महाविद्यालयांमध्ये विशेष तयारी केली आहे. सकाळी सात ते आठला शाळा-महाविद्यालयांमध्ये योग प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले आहे. योग संस्थांचे प्रतिनिधी विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिक शिकवणार असून, हजारो विद्यार्थी एकत्रितरीत्या सूर्यनमस्कार, ध्यानधारणा आणि योगाची प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.

योगाने मन प्रसन्न राहते...योग शारीरिक ताणतणावापासून दूर राहण्यास मदत करते आणि जीवनात चैतन्य फुलवते. कुठेतरी हेच महत्त्व जगभरातील लोकांपर्यंत पोचावे, यासाठी योग दिन साजरा करण्यात येत आहे. शहरात विविध संस्था-संघटनांनी त्याची तयारी केली आहे. आयटीतील नोकरदार असो वा वकील...डॉक्‍टर असो वा शिक्षक...प्रत्येक जण योगदिनी आयोजिलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. काही संस्था-संघटनांनी योग प्रशिक्षण शिबिरासह व्याख्याने, चर्चासत्रांसह योगाचे महत्त्व उलगडणारे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजिले आहेत.

शिक्षण प्रसारक मंडळीतर्फे सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी आठला योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या योगासनांच्या प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थेतर्फे होणाऱ्या योग महोत्सवात पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहणार आहेत. महोत्सवांतर्गत सुमारे 100 लोक एकत्र येऊन सकाळी सातला कॅम्प येथील वाडिया महाविद्यालयात योग प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.

Web Title: yoga day celebration