योगेश कडुसकर बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी

मिलिंद संगई
गुरुवार, 12 एप्रिल 2018

बारामती (पुणे) : येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून योगेश कडुसकर यांची आज नियुक्ती करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहायक आयुक्त या पदावर ते गेली तीन वर्षे कार्यरत होते. बारामतीचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांची कडुसकर यांच्या जागेवर सहायक आयुक्त म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत बदली झाली आहे.

शुक्रवारी (ता. 13) योगेश कडुसकर बारामतीचे मुख्याधिकारी म्हणून सूत्रे स्विकारणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंगेश चितळे यांनी बदली मागितली होती, त्या नुसार शासनाने त्यांची बदली केली असून आता युवा अधिकारी योगेश कडुसकर यांची बारामतीला नियुक्ती केली आहे. 

कडुसकर यांनी बारामतीला येण्यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तीन वर्षे काम केलेले असून बारामतीची त्यांची दुसरीच नियुक्ती आहे. बारामतीला नियुक्ती होणे हे आव्हानात्मक असून मुळातच सुंदर असलेले हे शहर अधिक स्वच्छ, सुंदर व हरित कसे करता येईल या साठी आपले प्राधान्य असेल, असे योगेश कडुसकर यांनी सकाळशी बोलताना सांगितले. नागरिक व नगरसेवकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असू, असेही ते म्हणाले. 

Web Title: Yogesh Kaduskar Chief Officer of Baramati Municipal Council