तुम्हीच सांगा, आम्ही कोरोनाशी लढा कसा द्यायचा?

Anganwadi
Anganwadi

पुणे - कोरोना बाधितांच्या सर्वेक्षणासाठी एकही आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक फिल्डवर  फिरकत नाही. सर्व काम अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या भरवशावर सुरू आहे...आम्ही दिलेल्या माहितीवरच आरोग्य विभागाचं काम सुरू आहे. आम्ही चार महिन्यांपासून जीव धोक्यात घालून काम करतोय... 13 मार्चला आम्हाला दोन मास्क आणि सॅनिटायझर दिले, त्यानंतर पुन्हा काही नाही. आम्हालाही लेकरं बाळं आहेत...आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांकडून चांगली वागणूक मिळत नाही...शिवाय तुटपुंजे मानधन, तेही दोन-दोन महिने मिळत नाही... या वेदना आहेत पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि गट प्रवर्तकांच्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परंतु कोरोनाविरुद्धची लढाई आहे कशा पद्धतीने सुरू आहे, हे यावरून काही अंशी स्पष्ट होते.  

आशा सेविकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून औषधांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे सर्वेक्षणासाठी गेल्यानंतर नागरिकांनी गोळ्या मागितल्यावर द्यायच्या कोठून.. स्वतःलाही दोन रुपये देऊन आरोग्य केंद्रात केस पेपर काढावा लागतो. एकही अधिकारी आमच्यासोबत सर्वेक्षणासाठी येत नाही. काही तक्रार केल्यास तुमच्याविरुद्ध फाईल तयार आहे, अशी धमकी दिली जाते. आम्हाला मार्च महिन्याचे मानधन आता मिळाले आहे. मागील दोन महिन्यांचे मानधन अद्याप मिळालेले नाही. तुम्हीच सांगा, आम्ही कोरोनाशी लढा कसा द्यायचा? शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथील आशा सेविका आपल्या व्यथा 'सकाळ'कडे मांडत होत्या.

खडकवासला येथील ब्युटी पार्लर चालक महिलेच्या घरातील सदस्यांचा कोरोना रिपोर्ट...

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मागण्या -
- आशा स्वंयसेविकांना दरमहा पाच हजार रुपये ठराविक वेतन आणि कामावर आधारीत मोबदल्यात वाढ करावी.
-  गटप्रवर्तकांना दरमहा दहा हजार रुपये मानधन द्यावे.
- लॉकडाऊन काळात दररोज तीनशे रुपये भत्ता देण्यात यावा.
-  मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात यावी.
- 50 लाख रुपयांचे विमा कवच देण्यात यावे.

Big Breaking : दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील 'त्या' दोघांचा सहभाग; जाणून घ्या, काय आहे हे प्रकरण?

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या -
अंगणवाडी कर्मचारी गेली अनेक वर्षे मानधनावरच आहेत. कोरोना योद्धा म्हणून त्यांनी संकटकाळात काम केले आहे. त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून सेविकांना तृतीय श्रेणी व मदतनिसांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनुसार लाभ द्यावेत
- अंगणवाडीतील लहान मुलांना, गर्भवती मातांना पोषण आहार द्यावा लागतो. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोरोना सर्वेक्षणाची कामे देऊ नयेत.
-  कार्यालयीन कामासाठी दिलेल्या मोबाईल दुरुस्ती विनामूल्य करून द्यावी. 
- निवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरची रक्कम देण्यात यावी
- सुरुवातीच्या तीन महिन्यांसाठी 50 लाख रुपयांचे विमा कवच सरकारने दिले होते. हे विमा कवच संपूर्ण कोरोना काळासाठी देण्यात यावे.

मसाज सेंटरच्या नावाखाली घडत होता 'हा' धक्कादायक प्रकार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंगणवाडी सेविका आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि स्त्री परिचर जोखीम घेऊन स्वतःच्या कुटुंबाची परवा न करता करीत आहेत. राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे.
- निलेश दातखिळे, सचिव, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी महासंघ

पुणे जिल्ह्यात
अंगणवाडी सेविका संख्या - 1413 
- मानधन आठ हजार 325 रुपये (प्रति महिना) 
- मदतनीस 4 हजार 425 रुपये 

आशा स्वयंसेविका संख्या : 3154 
मानधन दीड हजार रुपये, कामानुसार मोबदला

गटप्रवर्तक संख्या - 214 
- मानधन नाही
(प्रवासभत्ता सुमारे आठ हजार रुपये)

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com