Big Breaking : दहशतवादी कारवायांमध्ये पुण्यातील 'त्या' दोघांचा सहभाग; जाणून घ्या, काय आहे हे प्रकरण?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

सादिया ही समाजमाध्यमाद्वारे तरुणांची इसिसमध्ये भरती करणाऱ्यांच्या प्रक्रियेत होती, त्यांच्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली जात होती, असेही 'एनआयए'ने नमूद केले आहे. ​

पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी पुण्यातून ताब्यात घेतलेल्या आणि इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या तरुणीसह दोघांचा देशात मोठे घातपाती कृत्य करण्याच्या कटात सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तरुणी संबंधीत संघटनेसाठी तरुणांची भरती करण्याचे काम करत होती, तर तरुणाचा शस्त्र खरेदी, बनावट सीमकार्ड एकत्र करण्यामध्ये सहभाग असल्याची माहिती 'एनआयए'च्या चौकशीत पुढे आली आहे.

'कन्धों से मिलते हैं कन्धे'; लॉकडाऊनमध्ये प्रशासन घेणार गणेशोत्सव मंडळांची मदत!

नाबिल सद्दीक खत्री (वय-२७) आणि सादिया अन्वर शेख (वय-२२) असे 'एनआयए'ने अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दिल्ली येथील 'एनआयए'चे पथक रविवारी (ता.१२) पुण्यात आले होते. त्यांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने येरवडा आणि कोंढवा येथून दोघांना ताब्यात घेऊन दिल्ली येथे नेऊन त्यांची कसून चौकशी केली. या चौकशीतून महत्त्वाची माहिती पुढे आली.

कोण आहे सादिया आणि नाबील?
नाबील खत्री कोंढवा येथे वास्तव्यास असून तो तेथेच एक व्यायामशाळा चालवित आहे, तर सादिया ही येरवडा येथे राहत असून जिल्ह्यातील एका महाविद्यालयात मास कम्युनिकेशन्स अँड जर्नालिझमच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.

'...यामुळे २७ टक्के विद्यार्थ्यांना यंदा शिक्षण घेता येणार नाही'; सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक माहिती!​

दोघांचा 'इसिस'शी संबंध कसा?
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मार्च महिन्यात दिल्लीतील ओखला विहार परिसरातून जहांझीब सामी वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग या काश्मिरच्या दाम्पत्याला अटक केली होती. या दाम्पत्याचा 'इसिस'शी संलग्न आणि बंदी असलेल्या 'इस्लामिक स्टेट्स ऑफ खोरसाना' या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे देशविरोधी कार्यात सक्रिय असल्याचे उघड झाले होते. दरम्यान, 'एनआयए'च्या आणखी एका प्रकरणात (इसिसचे अबुधाबी मोड्यूल) तिहार तुरूंगात आधीच कैदी असलेला अब्दुल्ला बासिथ याच्याशी त्या दोघांचा संपर्क असल्याची माहिती पुढे आली होती.

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!​

दरम्यान, सादिया ही जहांझीब सामी, हिना बशीर बेग आणि अब्दुल्ला बासिथ यांच्याशी सातत्याने संपर्कात होती. 'इसिस'च्या विचारधारेचा प्रचार कसा करायचा आणि भारतातील त्याच्या कारवाया कशा वाढवाव्यात, याबददल त्यांच्यात चर्चा सुरू होती. दहशतवादी कारवायांसाठी तरुणांची भरती करून भारतात इसिसची केडर उभारण्याचा प्रयत्न ते करीत होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सामी, बासिथ यांच्यासह नाबील खत्री देखील शस्त्रे खरेदी, बनावट सिमकार्ड एकत्रित करण्याची व्यवस्था करून भारतात हिंसक दहशतवादी हल्ले करण्याच्या योजनेत सक्रियपणे सहभागी असल्याचे चौकशीत समोर आले आहे. तर सादिया ही समाजमाध्यमाद्वारे तरुणांची इसिसमध्ये भरती करणाऱ्यांच्या प्रक्रियेत होती, त्यांच्याकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली जात होती, असेही 'एनआयए'ने नमूद केले आहे. सादिया शेख आणि नाबील खत्री या दोघांना दिल्लीतील विशेष 'एनआयए' न्यायालयात आज हजर करण्यात आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National Investigation Agency on Sunday arrested two people from Pune who linked to ISIS