‘तु पुढचा वाजपेयी बनशील..’ सत्तार साहेबांच्या २० वर्षापुर्वीच्या शब्दाने बदलले तरुणाचे आयुष्य

बुटांच्या खरेदीसाठी स्केचर्स कंपनीच्या दुकानात बाप-लेकी जातात. खरेदी करतानाच अचानक एक तरुण समोर येतो आणि विचारतो, मला ओळखलं का?
You will become next Vajpayee Sattar Saheb words changed life of young man
You will become next Vajpayee Sattar Saheb words changed life of young manSAKAL

पुणे : बुटांच्या खरेदीसाठी स्केचर्स कंपनीच्या दुकानात बाप-लेकी जातात. खरेदी करतानाच अचानक एक तरुण समोर येतो आणि विचारतो, मला ओळखलं का? सहृदय भावनेने विचारलेल्या या प्रश्नाने क्षणभर दोघांनाही काहीच उमजत नाही. वडिलांनी खूप आठवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना काही केल्या ती व्यक्ती कोण आहे. हे आठवेनाच.. त्यानंतर त्या तरुणाने सांगितलेल्या २० वर्षांपूर्वीच्या आठवणीने गुरुवारी दिवसभर ट्वीटरवर अनेकांची मने जिंकून घेतली.

तर किस्सा असा आहे, डॉ. शबाना इनामदार स्केचर्स कंपनीच्या एका शोरूममध्ये बुटांची खरेदी करायला जातात. त्यांच्यासोबत त्यांचे वडीलही असतात. शोरूमधला एक व्यवस्थापक त्यांचा समोर येतो आणि डॉ. इनामदार यांच्या वडीलांना मला ओळखले का? असे विचारतो. वडिलांनी खूप आठवायचा प्रयत्न केला पण त्यांना काही आठवेना. शेवटी तो तरुण ती आठवण सांगतो, "२० वर्षांपूर्वी तुम्ही राहत होता. त्या भागात मी पेपर टाकण्याचे काम करायचो. तुमची बायको प्रत्येक ईदला मला शिरखुरमा खायला द्यायची. एकदा तुम्ही मला असं काही बोलला ज्यामुळे माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. तुम्ही मला म्हटलात की, एक दिवस तू नक्की पुढचा वाजपेयी बनशील.’’

थोडे सद्गदित होत तरुण म्हणाला, ‘‘सर, ती ओळखच माझी एवढ्या वर्षाची प्रेरणा ठरली आहे.’’ थोड थांबत त्या तरुणाने विचारले, ‘‘तुम्हाला माहिती आहे का, मला दहावीला किती गुण मिळाले होते?’’ या प्रश्नावर थोडेसे गहीवलेल्या डॉ. इनामदार यांच्या वडिलांनी नकारार्थी मान डोलावली. दहावीला त्या तरुणाला केवळ ४६ टक्के गुण मिळाले होते. पण त्याने सुरवातीला पेपरबॉय नंतर हाऊसकीपिंगमध्ये काम करत सेल्समन बनण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. आज तो स्केचर्स कंपनीचा एरिया मॅनेजर बनला आहे. तो म्हणतो,‘‘माझ्या घराच्या भिंतींवर आजही हे वाक्य लिहिले आहे. मी रोज माझ्या घराचे दार उघडले की समोरच्या भिंतीवर मला ही अक्षरे दिसतात.’’ डॉ. शबाना इनामदार सांगतात,‘‘मागील २० वर्षांपासून हा तरून माझ्या वडीलांना शोधत होता. आज त्याने केवळ आवाजावरून माझ्या वडीलांना ओळखलं. अन म्हणाला, आज तुमचा आवाज ऐकताच मला कळले की तुम्ही सत्तार साहेब आहेत.’’

ट्वीटरवर दोन्ही व्हिडिओ शेअर करत डॉ. इनामदार म्हणतात,‘‘पुण्याच्या रस्त्यावर कोणीतरी तुमचा आवाज ऐकून तुम्हाला २० वर्षांनंतर ओळखते ही भावना शब्दात, चित्रात किंवा व्हिडिओमध्ये टिपणे शक्य नाही. माझ्या वडिलांची मुलगी म्हणून मी आज शिकले, तुम्ही जे मागे सोडले तो वारसा आहे आणि तुम्ही जे आज कमावता ती ही तुमची अमूल्य ओळख आहे. आज दत्ता अल्मोर यांनी आम्हाला कृतज्ञतेची वृत्ती शिकवली.’’ सोशल मीडियावर सतत तुमच्यासाठी प्रेरणास्रोत बनलेल्या व्यक्तीला टॅग करण्याचे डॉ. इनामदार आवर्जून सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com