तो पबजी खेळत होता, बेशुद्ध पडला आणि जीव गमावला

young boy died while pubg game in pune pimpri ravet
young boy died while pubg game in pune pimpri ravet

पिंपरी Pune Pimpri Chinchwad : पबजी गेम खेळताना लोकांवर मानसिक आघात झाल्याचं आपण पाहिलंय. अनेक जण या गेमच्या नादाने वेडे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड जवळ रावेत येथे पब जी गेम खेळताना झटके आल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्यू झालेला तरुण 23 वर्षांचा आहे.

हर्षल देविदास मेमाणे (वय 23, रा. शिंदे वस्ती, रावेत) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास हर्षल राहत्या घरी मोबाईलवर पबजी गेम खेळत होता. त्यावेळी त्याला झटके येवू लागले. तसेच तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला तातडीने रावेत येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी (ता. 18 ) सकाळी पावणेसातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com