suiside.jpg
suiside.jpg

धक्कादायक : पुण्यात वडगाव ब्रिजला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

धायरी (पुणे) : सिंहगड रस्त्यावरील वडगाव ब्रिजला (वीर बाजी पासलकर उड्डाण पूल) एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी  धाव घेतली आहे. अद्याप मृताची ओळख पटलेले नाही. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे या तरुणाचे वय 25 ते 30 असावे. आज काही नागरिकांना वडगाव ब्रिजच्या खाली एक व्यक्ती साडीला लटकेलेला दिसला. त्यांनी तत्काळ सिंहगड रोड पोलिसांना कळवले. ही माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याची तपासणी केली असता खिशात सुसाईड नोट किंवा इतर काही सापडलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची ओळख पटलेली नाही.

ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी किंवा काल संध्याकाळी हा प्रकार घडला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com